एक्स्प्लोर
वन डे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स, झुलन गोस्वामी एकमेव महिला क्रिकेटर
झुलनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डेत लॉरा वॉलवर्डला माघारी धाडून 200 विकेट्सचा टप्पा गाठला.
किंबर्ले (दक्षिण आफ्रिका) : भारताची झुलन गोस्वामी ही वन डे कारकीर्दीत 200 विकेट्स घेणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पहिली महिला गोलंदाज ठरली. झुलनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डेत लॉरा वॉलवर्डला माघारी धाडून 200 विकेट्सचा टप्पा गाठला.
35 वर्षांच्या झुलनने आजवरच्या कारकीर्दीत 166 वन डेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या कालावधीत तिने 21.95 च्या सरासरीने 200 विकेट्स घेतल्या आहेत. 2002 साली क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या झुलनने वन डेसह आतापर्यंत 10 कसोटी आणि 60 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
पुरुषांच्या क्रिकेटमध्येही पहिल्यांदा 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्याचा विक्रमही भारताच्याच नावावर आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी 200 विकेट्सचा टप्पा सर्वात अगोदर पूर्ण केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement