40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा, 800 किमीचा रनअप; जेम्स अँडरसनने रचला भीमपराक्रम!

James Anderson Record: जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 हून अधिक चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

Continues below advertisement

James Anderson Record: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लंडनमधील लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. जेम्स अँडरसनच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. जेम्स अँडरसनने या शेवटच्या सामन्यात इतिहास रचून मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

Continues below advertisement

जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 हून अधिक चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटीत त्याने 40,000 चेंडू टाकण्याचा टप्पा ओलांडला. म्हणजे जेम्स अँडरसन गोलंदाजीच्या रनअपमध्ये जवळपास 800 किमी धावला आहे. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर जेम्स अँडरसननंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड हा वेगवान गोलंदाज आहे,  ज्याने कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 33,698 चेंडू टाकले.

कसोटीत सर्वाधित चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांची यादी-

कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजाबद्दल बोललो, तर श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन या यादीत अव्वल स्थानावर आहे. मुरलीधरनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 44,039 चेंडू टाकले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेंचा समावेश आहे. कुंबळेंनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 40,850 चेंडू टाकले. या यादीत तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा आहे. वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत 40,705 चेंडू टाकले. त्यानंतर जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे.

अँडरसनने टिपल्या 700 विकेट्स-

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीपूर्वी अँडरसनच्या नावावर 700 कसोटी विकेट्स होत्या. आता कसोटीचे दोन दिवस पूर्ण होईपर्यंत त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत अँडरसनने 703 कसोटी बळी पूर्ण केले आहेत. अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील 188 वा कसोटी सामना खेळत आहे.

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज-

जेम्स अँडरसन हा कसोटीत वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. तथापि, एकंदरीत पाहिल्यास, मुथय्या मुरलीधरन हा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे, ज्याच्या नावावर 800 बळी आहेत.

संबंधित बातमी:

आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

गौतम गंभीरची मागणी बीसीसीआयने फेटाळली?; टी. दिलीप पुन्हा फिल्डिंग कोच होण्याची शक्यता

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola