Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ट्रोलर्सकडून खलनायक ठरविला गेलेला हार्दिक पांड्या आता भारतीय विश्वविजयाचा नायक म्हणविला जातो आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही.
हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच (Natasha Stankovic) यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. कदाचित त्यांचा काडीमोडदेखील होऊ शकतो, अशा बातम्याही पसरल्या होत्या. याचदरम्यान हार्दिक पांड्याचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहे.
हार्दिक पांड्यासोबत फोटो काढल्यामुळे व्हायरल झालेली मुलगी एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचे नाम प्राची सोलंकी असे आहे. प्राची हार्दिकची चाहती असल्याने तिने त्याच्यासोबत फोटोशूट केले. तिने स्वत: हार्दिकसोबतचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. पांड्या कुटुंबियांचे आणि प्राची यांचे चांगले संबंध असल्याचे दिसून येत आहे. मात्र याचदरम्यान हर्दिकची पत्नी नताशाने देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नताशाची प्रतिक्रिया व्हायरल-
नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, मी इथे बसून कॉफी पीत आहे. माझ्या मनात एक विचार आला आणि मी तुमच्याशी शेअर करावे असे वाटले. लोक लोकांबद्दल किती लवकर सर्वकाही ठरवत असतात. त्यांना काहीच वाटत नाही. जर कोणी त्याच्या कॅरेक्टरबाहेर काही करत असेल तर लोक न थांबता काहीही बोलत सुटतात. त्याची परिस्थिती काय होत असेल? याचे त्यांना काहीच वाटत नाही. पण फक्त त्याला न्याय देण्यासाठी किंबहुना जज करण्यासाठी सर्वजण पुढे येतात, असं नताशा म्हणाली.
दोघांमध्ये काहीच आलबेल नाही-
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, असा दावा केला जातोय. नताशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्या पोस्टचा आधार घेत या दोघांच्या नात्यातील धुसफुसीचा अंदाज लावला जात होता. विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पांड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. या कारणामुळेही दोघांच्या नात्याच्या अफवेला हवा मिळाली होती. नताशाने हार्दिकसाठी विश्वचषक जिंकल्याची कोणतीही पोस्ट केलेली नाही. या विजयावर नताशाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, हार्दिकच्या मेहुण्याने, म्हणजेच मोठा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने भारताच्या विजयानंतर हार्दिकसाठी एक भावनिक पोस्ट केली होती. पोस्ट शेअर करत हार्दिकने पंखुरी शर्माला आपला आधारस्तंभ असं म्हटलं आहे.
संबंधित बातमी:
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमकं काय घडलं?