एक्स्प्लोर
Advertisement
जमैका कसोटीत पावसाचा खेळ, भारताचा विजय लांबणीवर
जमैका : जमैका कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडियाचा विजय आणखी लांबणीवर पडला आहे. वरुणराजाच्या आगमनामुळे चौथ्या दिवशी केवळ 15 षटकं आणि पाच चेंडूंचाच खेळ होऊ शकला.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विंडीजची चार बाद 48 अशी अवस्था झाली असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अजूनही 256 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी विंडीजच्या सहा विकेट्स काढण्याचं आव्हान असेल.
खरंतर पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ उशिराने सुरु झाला होता. पण भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन विंडीजला एकामागून एक चार दणके दिले. मोहम्मद शमीनं दोन, तर ईशांत शर्मा आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट काढली.
दरम्यान भारताने पहिल्या डावात 9 बाद 500 धावांची मजल मारुन विंडीजवर 304 धावांची आघाडी घेतली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement