एक्स्प्लोर
मुलाचं नाव दाऊद ठेवू नको, टीकाकाराच्या ट्वीटला इरफानचा स्मार्ट रिप्लाय
मुंबई : क्रिकेटर इरफान पठाण आणि त्याची पत्नी साफा बेग नुकतेच आई-बाबा बनले. सगळ्यांप्रमाणे इरफान पठाणनेही मुलगा झाल्याची गोड बातमी ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
पण काही दिवसांपूर्वीच आई-बाबा बनलेल्या सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलाच्या नावावरुन जोरदार चर्चा, वाद सुरु आहे. सैफीनाने मुलाचं नाव तैमूर ठेवल्याने सोशल मीडियावर टीकाही केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर एका ट्विपलने इरफान पठाणला फुटकचा सल्ला दिला. मुलगा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन पण मुलाचं नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नको. जग अतिशय वाईट आहे, असं ट्वीट दिव्यांशू राज नावाच्या युझरने केलं.
https://twitter.com/MSDivyanshu/status/811773122106064896
मात्र यावर इरफान पठाणने दिलेल्या स्मार्ट उत्तराने अनेकांची मनं जिंकली. नाव काहीही ठेवू, पण एक गोष्ट नक्की आहे ती, मुलगा बाबा किंवा काकाप्रमाणेच देशाचं नाव उज्ज्वल करेल, असा रिप्लाय इरफानने दिला.
https://twitter.com/IrfanPathan/status/811985372569747456
इरफानचं हे ट्वीट एक हजारांहून जास्त युझर्सनी लाईक केलं. तर 500 हून अधिकांनी ते रिट्वीट केलं. दरम्यान, इरफान पठाणने त्याच्या मुलाचं नाव इम्रान खान पठाण असं ठेवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement