एक्स्प्लोर
IPL 10: ..तर कोहली ऐवजी डिव्हिलियर्स RCB चा कर्णधार!
मुंबई: आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम काहीशी अडचणीत आहे. कारण आरसीबीचा कर्णधार विराट कोहली अजूनही फिट नाही. त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे.
जर विराट पहिल्या काही सामन्यांत खेळू शकला नाही तर एबी डिव्हिलियर्स संघाचं नेतृत्त्व करेल, असं आरसीबीचे हेड कोच डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितलं.
कोहली 2 एप्रिलला संघासोबत येईल. त्यानंतर मेडिकल स्टाफ याबाबतचा निर्णय घेईल.
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कोहली शेवटच्या चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता.
ही कसोटी भारताने 2-1 अशी जिंकली होती.
दरम्यान डिव्हिलियर्सही 2 एप्रिलपासूनच संघात सहभागी होईल. सध्या तो मोमेंटम वन डे चषकाच्या फायनलमध्ये व्यस्त आहे.
विराटनंतर डिव्हिलियर्स हा आरसीबीचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
नाशिक
Advertisement