इकडं वर्ल्डकपमध्ये निवड, तिकडं आयपीएलमध्ये लाजीरवाणी कामगिरी, चहल ठरला महागडा, संजू शून्यावर बाद
IPL 204 : आयपीएलमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली, पण विश्वचषकात निवड झाल्यानंतर चहल फ्लॉप गेला आहे.
Yuzvendra Chahal Sanju Samson IPL 204 : फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याला टी20 विश्वचषकाच्या 15 सदस्यीय खेळाडूंमध्ये स्थान मिळालं. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली, पण विश्वचषकात निवड झाल्यानंतर चहल फ्लॉप गेला आहे. चहलच नाही तर टीम इंडियाचे इतर धुरंधरही फ्लॉप गेले आहेत. युजवेंद्र चहल यानं हैदराबादविरोधात महागडी गोलंदाजी केली. चहलच्या आयपीएल इतिहासातील ही सर्वात खराब गोलंदाजी ठरली. युजवेंद्र चहल यानं आपल्या षटकात तब्बल 6 षटकार दिले. चहलच्या महागड्या गोलंदाजीमुळे हैदराबादनं मोठी धावसंख्या उभारली.
युजवेंद्र चहल यानं हैदराबादविरोधात महागडा स्पेल टाकला. चहल यानं आपल्या चार षटकांमध्ये तब्बल 62 धावा खर्च केल्या. त्याला धावा रोखत्या आल्या नाहीच, पण विकेटही घेण्यात अपयश आले. चहलनं आपल्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडी गोलंदाजी केली. त्यावरुन त्याच्यावर टीकास्त्र होत आहे. एकीकडे विश्वचषकात निवड झाली, त्यानंतर मात्र कामगिरीत सातत्य दिसत नसल्याची टीका त्याच्यावर होत आहे.
Yuzvendra Chahal bowled his most expensive spell in IPL history. pic.twitter.com/L9TITR6YAz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2024
संजू सॅमसनही फ्लॉप -
संजू सॅमसन यालाही विश्वचषकाच्या संघात स्थान मिळालं. पण त्यानंतर मात्र त्याची कामगिरी सुमार झाल्याचं समोर आलेय. संजू सॅमसन यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये खोऱ्यानं धावांचा पाऊस पाडला होता. पण आज त्याला खातेही उघडता आले नाही. तो गोल्डन डकचा शिकार झाला. संजू सॅमसन याला भुवनेश्वर कुमार यानं अप्रतिम चेंडूवर त्रिफाळाचीत केले.
A 3 ball duck by Sanju Samson. pic.twitter.com/1sfmbNfujH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2024
यांचाही फ्लॉप शो -
कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनाही मागील सामन्यात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. विश्वचषकात स्थान मिळाल्यानंतर कामगिरीत सातत्य राहिलं नाही. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. बुमराहलाही गोलंदाजीत प्रभावी मारा करता आला नाही. त्याशिवाय हार्दिक पांड्या फलंदाजीत फेल गेला. याचा परिणाम मुंबईला पराभवाचा सामना करावा लागाल. दुसरीकडे चेन्नईचा विस्फोटक फलंदाज शिवम दुबे यालाही दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. विश्वचषकाच्या ताफ्यात स्थान मिळालं, पण दुबे आयपीएलमध्ये फ्लॉप गेला. या सर्वांवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर मिम्स पोस्ट केले जात आहेत.