(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WPL 2023 : आज आरसीबीचा संघ उतरणार मैदानात, समोर यूपी वॉरियर्सचं आव्हान, कधी कुठे पाहाल सामना?
RCB-W vs UPW-W, Match Preview : पहिल्या तिन्ही सामन्यात पराभूत झालेला रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा संघ आज स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (10 मार्च) हंगामातील आठवा सामना खेळवला जाईल. हा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स (RCB vs UPW) या संघांमध्ये होणार आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या यंदाच्या हंगामात खराब कामगिरीमुळे चर्चेत असणारा रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा संघ आतापर्यंत तीन सामने पराभूत झाला आहे. आजतरी ते आपला पहिला विजय मिळवलतील का? हा प्रश्न सर्वांसमोर आहे. दुसरीकडे यूपी वॉरियर्स संघाने आपला एक सामना जिंकला असून एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांनाही विजयाची गरज आहे. तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...
सामना कधी होणार?
रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 10 मार्च रोजी सामना होणार आहे.
सामना कुठे होणार?
रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्सया महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
कसे आहेत दोन्ही संघ?
यूपी वॉरियर्सचा संघ : अलिसा हेली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस बेरेन हॅरिस, लासेल, लासेल , पार्शवी चोप्रा , सोप्पधंडी यशश्री
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), हीदर नाइट, कनिका आहुजा, पूनम खेमनार, श्रेयंका पाटील, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस, दिशा कासट, एरिन बर्न्स, कोमल झांझाड, इंद्राणी रॉय, सहाना पवार, आशा शोबाना, डेन व्हॅन निकर्क
हे देखील वाचा-
- WPL 2023: जेमिमानं पकडला महिला प्रीमियर लीगमधील शानदार झेल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल