WPL 2023 : आज ठरणार महिला प्रिमीयर लीगचा पहिला विजेता, मुंबई विरुद्ध दिल्ली सामना, कधी कुठे पाहाल मॅच?
MI-W vs DC-W, Match Preview : महिला आयपीएलचा अखेरचा सामना म्हणजेच फायनल आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळवला जाणार आहे.
![WPL 2023 : आज ठरणार महिला प्रिमीयर लीगचा पहिला विजेता, मुंबई विरुद्ध दिल्ली सामना, कधी कुठे पाहाल मॅच? WPL 2023 Final Match MI-W vs DC-W match preview match predictions when and where to watch WPL 2023 : आज ठरणार महिला प्रिमीयर लीगचा पहिला विजेता, मुंबई विरुद्ध दिल्ली सामना, कधी कुठे पाहाल मॅच?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/26/e1499dda3bd07e017cb4693684a4c8da1679802702616206_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा यंदाचा हा पहिलाच हंगाम असून आज स्पर्धेचा विजेता कोण हे स्पष्ट होणार आहे. आज (26 मार्च) अखेरचा म्हणजेच फायनलचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार असून दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचा विचार केल्यास दोघांनी अखेपर्यंत टेबल टेबल टॉपर राहण्याची कमाल केली. दोघांनी देखील प्रत्येकी 8-8 सामने खेळले असून दोघांनी देखील 6-6 सामने जिंकले असून 2-2 सामने गमावले आहेत. आधी दिल्लीचा संघ फायनलमध्ये पोहोचला ज्यानंतर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरच्या सामन्यात युपी वॉरियर्सला मात देत फायनल गाठली आहे. दोघांनी यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केल्याने एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो... तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...
सामना कधी होणार?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 26 मार्च रोजी हा फायनलचा सामना होणार आहे.
सामना कुठे होणार?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या फायनलच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
कसे आहेत दोन्ही संघ?
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ : मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, तीतस साधू, स्नेहा दीप्ती, लॉरा हॅरिस, पूनम यादव
मुंबई इंडियन्सचा महिला संघ : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, हेदर ग्रॅहम, क्लो ट्रायॉन, धारा गुज्जर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)