WPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्समध्ये रंगणार एलिमिनेटरचा सामना, कधी कुठे पाहाल मॅच?
MI-W vs UPW-W, Match Preview : आधीच फायनलमध्ये पोहोचलेल्या दिल्ली संघाविरिुद्ध कोणता संघ मैदानात उतरणार यासाठी मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्समध्ये एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे.

WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचे आता अखेरचे दोन सामने राहिले आहेत. एकीकडे आधीच फायनलमध्ये पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरिुद्ध कोणता संघ मैदानात उतरणार यासाठी मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्समध्ये (Mumbai Indians vs UP Warriors) एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघानी दमदार कामगिरी केली आहे. पण मुंबई इंडियन्सने मागील काही सामने गमावल्यामुळे नेट-रनरेटच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुढे पोहोचला आणि थेट फायनलमध्ये पोहोचला. दुसरीकडे युपी संघानेही चांगली कामगिरी केली असल्याने आता ते देखील मुंबईविरुद्ध फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे या दोघांमध्येच आता सामना रंगणार आहे.
मुंबई आणि युपी दोन्ही संघानी आतापर्यंत दमदार खेळ दाखवला आहे. दोघांनी देखील प्रत्येकी 8-8 सामने खेळले असून मुंबई इंडियन्सने केवळ दोन सामने गमावले असून 6 विजय मिळवले आहेत. तर युपी संघाने 4 सामने गमावले असून 4 सामने जिंकले आहेत. तसंच दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंचा भरणा असून मुंबईची मदार कर्णधार हरमनप्रीतवर तर युपीची मदार एलिस हेली हिच्यावर आहे. त्यामुळे एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो... तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...
सामना कधी होणार?
मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये उद्या म्हणजेच 24 मार्च रोजी सामना होणार आहे.
सामना कुठे होणार?
मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
हे देखील वाचा-


















