MS Dhoni LSG vs CSK : चालू सामन्यात MS धोनी अंपायरशी भिडला, थालाकडून मोठी घोड चुक अन्... नेमकं काय घडलं?
आयपीएल 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी खेळत आहे.

MS Dhoni LSG vs CSK IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी खेळत आहे. या सामन्यात, पुन्हा एकदा एमएस धोनी सीएसकेचे नेतृत्व सांभाळत आहे. धोनीने त्याच्या कर्णधारपदाच्या काळात अनेक वेळा असे निर्णय घेतले आहेत की मैदानी पंचही आश्चर्यचकित होतात. दरम्यान, चालू सामन्यात एमएस धोनीने अंपायरशी भिडला. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया...
थालाकडून मोठी घोड चुक अन् पंचांनी दिला इशारा...
चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स ( Lucknow Super Giants vs Chennai Super Kings, 30th Match) यांच्यात खेळल्या गेलेल्या 30 व्या सामन्यात जेव्हा सीएसके संघ गोलंदाजी करत होता. त्यावेळी ही घटना घडली. झालं असं की, कर्णधार महेंद्रसिंग धोनी षटकांमध्ये जास्त वेळ घेत होता. यानंतर, आठव्या षटकात, पंचांनी महेंद्रसिंग धोनीला इशारा दिला. धोनीला पहिल्यांदाच इशारा मिळाला आहे. ऋतुराज जखमी झाल्यानंतर, महेंद्रसिंग धोनी गेल्या दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. या हंगामात त्याची बॅटही बरीच शांत राहिली आहे.
नियम काय सांगतो?
एलएसजी विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर करत होता. या काळात, तो दोन षटकांमध्ये खूप वेळ घेत होता. पण त्याची वेळ निश्चित आहे. यावर पंचांनी धोनीला इशारा दिला. नियमांनुसार, जर एखाद्या कर्णधाराने इशारा दिल्यानंतरही सामन्यादरम्यान वेळ वाया घालवला तर पंच विरोधी संघाला 5 धावांचा बोनस देतात. त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अंपायरशी बोलताना दिसला. या हंगामात सीएसकेला धावा करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर आहे. महेंद्रसिंग धोनीला संघाची कमान देण्यात आली आहे.
दोन वर्षांनी धोनी पुन्हा कर्णधारपदी परतला...
धोनीने शेवटचे 2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले होते. त्या हंगामात चेन्नईने विजेतेपद जिंकले होते. गुजरात टायटन्सविरुद्ध जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये फटके मारून संघाला विजय मिळवून दिला होता. जवळजवळ दोन वर्षांनंतर, धोनी पुन्हा एकदा कर्णधार म्हणून परतला आहे. या हंगामात फलंदाजीच्या क्रमाने उतरल्याबद्दल महेंद्रसिंग धोनीवरही बरीच टीका होत आहे. पण, गेल्या दोन सामन्यांमध्ये धोनीने उंच फलंदाजी केली आहे.
हे ही वाचा -





















