RCB vs MI : शनिवारी पुण्यातील गहूंजेच्या एमसीए मैदानावर (MCA Ground) आयपीएलचा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (MI vs RCB) सामना पार पडला. या सामन्यादरम्यान मैदानावर पळत जाऊन विराट कोहलीला हात मिळवणं एका चाहत्याला चांगलच महागात पडलं आहे. सामन्यावेळी मैदानात घुसल्यामुळे आता त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
शनिवारी पुण्यातील गहूंजेच्या एमसीए मैदानावर मैदानावर आयपीएलचा सामना सुरू होता. भारतीय क्रिकेट संघाचे आजी-माजी कर्णधारांसह जगातील सर्वोत्तम खेळाडू मैदानात आमने-सामने भिडत होते. तेंव्हाच 26 वर्षाच्या दशरथ जाधवला मैदानात जाण्याचा मोह आवरला नाही. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची नजर चुकवत तो अचानकपणे मैदानात शिरला. पळत जाऊन आधी विराट कोहलीला हस्तांदोलन करण्याच्या हेतूने मुठ्ठी बांधून विराटच्या मुठ्ठीला स्पर्श केला. ताब्यात घेण्यासाठी मागे सुरक्षा रक्षक आणि पोलीस होतेच. पण चपळाईने तो रोहित शर्माकडे वळाला, पण तेव्हाच यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मैदानाबाहेर आणत असताना देखील दशरथने वाद घातले. इथंच न थांबता तो पोलिसांच्या अंगावर ही तो धावून गेला. त्यामुळे त्याला अटक करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मोह न आवरल्याने खावी लागणार तुरुंगाची हवा
इतके आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू पाहिल्यावर पाहून, मैदानात सामना पाहायला येणाऱ्या प्रत्येकाला त्या खेळाडूंना भेटायचं, त्याच्यासोबत फोटो काढायचा मोह नक्कीच आवरता येत नाही. त्यातूनच असे नको ते वेडं धाडस करणारे थेट मैदानात घुसतात. अशा प्रसंगामुळे खेळात काही वेळाचा व्यत्यय येतो. क्षणार्धात फेमस होण्यासाठी हे असे कृत्य केले जातात, पण यातून स्वतःची नाहक बदनामी होते, याचा मात्र त्यांना विसर पडतो. आता दशरथवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक करण्यात आलीये. त्यामुळे त्याला काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- KKR vs DC, Match Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर
- RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha