IPL 2022 KKR vs DC : आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट राइडर्सचा (KKR) सामना आज दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होणार आहे. रविवारी दुपारी 3.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोलकाताच्या संघाकडून चाहत्यांना जात अपेक्षा असल्याचं मानलं जात आहे. कोलकाताने मुंबईविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. तर दिल्लीला (DC) शेवटच्या सामन्यात लखनौकडून (LSG) पराभव स्वीकारावा लागला होता.


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरची (KKR) कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. कोलकाता संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून केवळ एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे, यंदाच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने विजयाने सुरुवात केली आणि नंतर त्यांना सलग पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे दिल्ली पॉईंट्स डेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी दिल्लीच्या संघासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.


दिल्लीचा गुजरात आणि लखनौकडून पराभव
पंत आणि अय्यर हे दोघेही भारतीय संघाचे भावी कर्णधार म्हणून ओळखले जात असून या सामन्यात दोघेही कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान दिल्लीच्या संघावर थोडे दडपण असेल कारण दिल्लीच्या संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. दिल्ली कॅपिटल्सला लखनौ सुपर जायंट्सकडून जवळच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर गुजरात टायटन्सविरुद्धही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.


वॉर्नर आणि शॉ यांच्याकडून अपेक्षा
दिल्लीच्या संघाला पृथ्वी शॉ आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्याकडून दमदार सुरुवातीची आशा असेल कारण त्यांच्या मधल्या फळीने अद्याप काहीही आश्चर्यकारक केले नाही. शॉने लखनौच्या संघाविरुद्ध ३४ चेंडूत ६१ धावा केल्या. या सामन्यापूर्वी KKR च्या संघाचे मनोबल खूप आहे, ज्याने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता ज्यात पॅट कमिन्सने 15 चेंडूत 56 धावा केल्या होत्या.


संभाव्य प्लेइंग इलेव्हन येथे जाणून घ्या


दिल्ली कॅपिटल्स संभाव्य अंतिम 11  
ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, अॅनरिक नोरखिया.


केकेआर संभाव्य अंतिम 11  
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कॅप्टन), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha