IPL 2022 RR vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) सामना लखनौ सूपर जायंट्ससोबत (LSG) होणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चांगल्या स्थितीत आहेत. पॉईंट्स टेबल लखनौ चौथ्या स्थानावर तर राजस्थान पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून दोन्ही संघांना आपले स्थान अधिक मजबूत करण्याची संधी आहे. या सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.


जाणून घ्या खेळपट्टीची काय स्थिती आहे?
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर येथे बॉलला चांगली उसळी मिळते. त्यामुळे अशी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी मदतशीर ठरते. मात्र वेळेनुसार चेंडूंचा अंदाज येईल त्यानुसार फलंदाजी करणंही सोपे जाईल. तसेच पीचवर दव असल्याने दुसऱ्या डावात धावा करणे अधिक सोपे असेल. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. 


राजस्थान रॉयल्स संभाव्य 11 संघ


राजस्थान संघात जेम्स नीशमचे पुनरागमन होऊ शकते. राजस्थानकडे सध्या डेथ बॉलर्सची कमतरता आहे. अशा परिस्थितीत नीशमची भूमिका महत्त्वाची ठरु शकते.


जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, जेम्स नीशम, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, प्रणंदेश कृष्णा, युझवेंद्र चहल.


लखनौ सूपर जायंट्स संभाव्य 11 संघ


एविन लुईसच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, अशा स्थितीत त्याच्या जागी मार्कस स्टॉइनिसला संधी दिली जाऊ शकते.


केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha