KKR vs DC, Match Highlights : केकेआर पराभूत, दिल्लीने 44 धावांनी दिली मात
मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात आज टेबल टॉपर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (KKR vs DC) पार पडला आहे.
दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी करत दिल्लीने टेबल टॉपर केकेआरला 44 धावांनी मात दिली आहे.
केकेआरला विजयासाठी 12 चेंडूत 57 धावांची गरज असून हातात दोनच विकेट आहेत.
एकामागोमाग एक केकेआरचे फलंदाज बाद होत असून 17 षटकानंतर केकेआरचा स्कोर 152 वर 8 बाद आहे.
केकेआरचा आणखी एक गडी बाद झाला आहे. खलील अहमदने आणखी एक विकेट घेत सॅम बिलिंग्जला माघारी धाडलं आहे. सॅमने 15 धावा केल्या.
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर 54 धावा करुन बाद झाला आहे. कुलदीप यादवने त्याला बाद केलं आहे.
नितीश राणाची विकेट ललित यादवने घेतल्यामुळे केकेआरचा तिसरा गडी तंबूत परतला आहे.
कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी क्रिजवर टिकून राहिल्यामुळे केकेआरने 100 धावा पूर्ण केल्या आहेत.11 षटकानंतर 102 वर एक बाद अशी केकेआरची धावसंख्या आहे.
आज नॉर्खिया जागी संधी मिळालेल्या खलील अहमदनं दुसरी विकेट घेत 8 धावांवर अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं आहे.
केकेआरला पहिला झटका बसला असून खलील अहमदने वेंकटेश अय्यरला 18 धावांत तंबूत धाडलं आहे.
अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर यांनी अखेरच्या काही षटकात तुफान फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 200 पार केली आहे. आता केकेआरला विजयासाठी 216 धावांची गरज आहे.
18 षटकानंतर दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या 176 वर पाच बाद अशी आहे.
सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने एका बाजूने संघाची फलंदाजी सांभाळली होती. पण 61 धावा करुन तोही बाद झाला आहे. उमेश यादवने त्याची विकेट घेतली आहे.
सुनील नारायणने आणखी एक विकेट घेतली असून त्याने रोवमेन पोवेलला 8 धावांवर बाद केलं आहे.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 27 धावा करुन रसेलच्या चेंडूवर झेलबाद झाला. ज्यानंतर केवळ एक धाव करुन ललित यादवही नारायणच्या चेंडूवर पायचीत झाला आहे.
धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं यंदाच्या हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे.
51 धावा करुन पृथ्वी शॉ बाद झाला आहे. वरुण चक्रवर्थीने त्याला त्रिफळाचीत केलं आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एकोणीसव्या सामन्यात कोलकाताविरुद्ध दिल्लीची चांगली सुरुवात झाली आहे. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वार्नर आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत. दिल्लीनं चार षटकातच एकही विकेट न गमावता 50 धावांचा टप्पा गाठला आहे.
दिल्लीविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकात्याकडून पहिलं षटक टाकण्यासाठी उमेश यादव मैदानात आला आहे. तर, दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वार्नर सलामी देण्यासाठी आले आहेत.
ऋषभ पंत (कर्णधार,विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, खलील अहमद
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.
नुकतीच नाणेफेक पार पडली असून कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आहे.
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.
ऋषभ पंत (कर्णधार,विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, ए. नॉर्खिया
पार्श्वभूमी
KKR vs DC, Live Updates : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) या दोघांमध्ये पार पडत आहे. सध्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या केकेआरसाठी आजचा विजय हा स्पर्धेतील चौथा विजय ठरू शकतो. तर दिल्ली संघाने तीन पैकी दोन सामने गमावले असल्याने आज गुणतालिकेत वर चढण्यासाठी त्यांना आजचा सामना महत्त्वाचा असेल.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पार पडणाऱ्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी पार पडणाऱ्या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने या ठिकाणी खेळणं अडचणीचं होतं. पण आजचा सामना दुपारी असल्याने दवामुळे अधिक अडचण होणार नाही. यंदाच्या स्पर्धेतील ब्रेबॉर्न मैदानावर दुपारी पार पडणारा हा दुसराच सामना असणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीने मिळवलेला यंदाचा एकमेव विजय याच ठिकाणी मिळवल्याने आज त्यांना विजय मिळवण्याची सुवर्णसंधी असेल.
दिल्ली कॅपिटल्स अंतिम 11
ऋषभ पंत (कर्णधार,विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रेहमान, ए. नॉर्खिया
केकेआर अंतिम 11
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Maharashtra Kesari 2022 : तब्बल दोन दशकानंतर महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरकडे, अंतिम लढतीत पृथ्वीराज पाटील विजयी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -