CSK vs SRH, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात हैदराबादने चेन्नईला 8 विकेट्सनी मात देत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. तर दुसरीकडे चेन्नईला सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत हैदराबादने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर चेन्नईला 154 धावांमध्ये रोखत अभिषेक शर्माच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर 17.4 षटकात आव्हान पूर्ण करत सामन्यात विजय मिळवला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


CSK vs SRH 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक हैदराबादने जिंकल्यामुळे त्यांना प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली.

  2. सामन्यात चेन्नईच्या फलंदाजीत घडलेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे मोईन अलीने केलेल्या 48 धावा. त्याच्या या धावांमुळे संघाला फायदा झाला

  3. चेन्नईचा स्कोर अत्यंत कमी असताना अखेरच्या काही षटकात कर्णधार जाडेजाने केलेल्या 23 धावांमुळे संघ दीडशे धावा पार करु शकला.

  4. हैदराबादकडून सर्वच गोलंदाजांनवी कसून गोलंदाजी केली. पण सुंदरने 4 षटकात 21 धावा देत 2 विकेट्स घेत सर्वात चांगली गोलंदाजीचं दर्शन घडवलं.

  5. हैदराबादच्या फलंदाजीचा विचार करता अभिषेक शर्मा या युवा खेळाडूच्या 75 धावा अत्यंत महत्त्वाच्या होत्या.

  6. अभिषेकला केनने दिलेली उत्तम सुरुवात ज्यामुळे 89 धावांची भागिदारी हैदराबादने केली हा सामन्यातील एक किपॉईंट ठरला.

  7. राहुल त्रिपाठीची 39 धावांची फिनीशिंग खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली.

  8. हैदराबाद याआधी चेन्नईविरुद्ध 17 पैकी 12 सामन्यात पराभूत झाली आहे. यंदाही त्यांनी दोन पराभव पचवले असताना आज संयमी खेळीमुळे विजय मिळवला.

  9. चैन्नई आयपीएलमधील एक बलाढ्य संघ असूनही त्यांना यंदा सलग 3 पराभव पत्करावे लागले असल्याने आजचा सामनाही जिंकण्यात त्यांना यश आलं नाही, यामागे आतापर्यंतची खेळी कारणीभूत असावी

  10. सामन्यात केन विल्यमसनने सर्व गोलंदाजांचा केलेला उत्तम वापर त्यांच्या विजयात एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha