MI vs KKR IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये रविवारी (16 एप्रिल) रोजी वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना खेळवला गेला. दरम्यान, या सामन्यात नियम मोडल्याप्रकरणी दोन्ही संघातील तीन खेळाडूंना लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) गोलंदाज हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) यांना रविवारच्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचा (IPL Code of Conduct) भंग केल्याबद्दल लाखोंचा दंड भरावा लागणार आहे.


IPL 2023 : सामन्यादरम्यान राणा आणि शौकीनमध्ये वाद


या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या सामन्यातील मानधनातील काही टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे. केकेआरचा( KKR) कर्णधार नितीश राणाला मानधनाच्या 25 टक्के आणि मुंबई संघाच्या (MI) हृतिक शोकीनला मानधनाच्या 10 टक्के रक्कमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


नितीश राणा आणि शोकीनला लाखोंचा दंड


मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज शोकीनने केकेआरच्या नितीश राणाला बाद केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. भरमैदानात दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यामुळे आयपीएलकडून या दोघांनाही लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे.






सुर्यकुमार यादवला लाखोंचा दंड


दरम्यान, आयपीएलच्या (IPL 2023) 22 व्या कोलकाता (KKR) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav ) देखील आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या स्लो ओव्हर रेटमुळे सूर्यकुमारला दंड ठोठावला आहे. आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारी (16 एप्रिल) खेळल्या गेलेल्या मुंबई विरुद्ध कोलकाचा सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईचा कर्णधार सुर्यकुमार यादवला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


रविवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाने गोलंदाजी वेळी बराच वेळ वाया गेला. यामुळे परिणामी मुंबई इंडियन्सला आयपीएलने नेमून दिलेल्या वेळेत षटकं टाकता आली नाहीत. त्यांनी स्लो ओव्हर टाकत सामन्यासाठी अधिक वेळ घेतला. यामुळेच सामन्यानंतर आयपीएल समितीने मुंबईचा कर्णधार सुर्यकुमार यादवला दंड ठोठावला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RCB vs CSK Head to Head : बंगळुरुच्या मैदानावर धोनी आणि कोहली आमने-सामने, कोण ठरणार वरचढ? पाहा काय सांगते आकडेवारी