IPL 2023 Orange & Purple Capआयपीएलचा 16 वा हंगाम सुरु आहे. आतापर्यंत 23 सामने खेळवण्यात आले आहेत. दहा संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण आघाडीवर आहे आणि सर्वाधिक विकेट कोणी घेतल्या आहेत जाणून घ्या.


ऑरेंज कॅप (Orange Cap)


कोलकाता (KKR) नाईट रायडर्सच्या व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धमाकेदार शतक ठोकलं. आयपीएल 2023 मधील हे दुसरं शतक आहे. यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक हॅरी ब्रूकनं झळकावलं. दरम्यान, या शतकी खेळीनंतर कोलकाताचा स्टार सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. व्यंकटेशने शिखर धवनकडून ऑरेंज कॅप (Orange Cap) हिसकावून घेतली आहे. ऑरेंज कॅप सध्या व्यंकटेश अय्यरकडे असून त्याच्या नावावर 234 धावा आहेत. त्यानंतर फक्त एक धावाने दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. तर शुभमन गिल या शर्यतीत 228 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.


टॉप 5 फलंदाजाची यादी पाहा



  • व्यंकटेश अय्यर - 234 धावा

  • शिखर धवन - 233 धावा

  • शुभमन गिल - 228 धावा

  • डेव्हिड वॉर्नर - 228 धावा

  • विराट कोहली - 214 धावा






पर्पल कॅप (Purple Cap)


यंदाच्या आयपीएलमध्ये युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पर्पल कॅप (Purple Cap) च्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. चहल यंदा आता राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. लेगस्पिनर चहलकडे सध्या पर्पल कॅप आहे. त्याने 5 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. चहलकडे 7.85 ची एकोनॉमीने आहे. या यादीत युजवेंद्र चहल 11 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोलंदाजांच्या विकेट्सची संख्याही तितकीच आहे. 






सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतील टॉप 5 खेळाडूंचा यादी पाहा.



  • युझवेंद्र चहल - 11 विकेट्स

  • मार्क वुड - 11 विकेट्स

  • राशिद खान - 11 विकेट्स

  • मोहम्मद शमी - 10 विकेट्स

  • रवी बिश्नोई - 8 विकेट्स


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : राजस्थान आणि मुंबईचा विजय, गुणतालिकेत बदल; पॉईंट्स डेबलमधील अपडेट पाहा