Rajasthan Royals vs Gujarat Titans : आयपीएलच्या 16 व्या हंगामात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गतविजेता गुजरात टायटन्स (GT) आणि गेल्या मोसमातील उपविजेते राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रोमांचक सामना रंगला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाने 19.2 षटकांत सात गडी गमावून 179 धावा करून सामना जिंकला.
सॅमसन आणि हेटमायरचं दमदार अर्धशतक
आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) बाजी मारली. राजस्थान संघाने गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाला 20 षटकांत केवळ 178 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना राजस्थान संघाने शेवटच्या षटकात चार चेंडू शिल्लक असताना जिंकला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरनं दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला.
आयपीएलमध्ये राजस्थानचा गुजरात विरुद्धचा पहिला विजय
राजस्थान रॉयल्सने अखेर इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पहिला विजय मिळवला. गेल्या मोसमात त्यांना गुजरातकडून अंतिम फेरीसह तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. रोमहर्षक सामन्यात गुजरातचा पराभव करत राजस्थानने अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19.2 षटकांत सात गडी गमावून 179 धावा करून सामना जिंकला.
राजस्थानकडून गुजरातचा तीन गडी राखून पराभव
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्याने 32 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार ठोकले. शिमरॉन हेटमायरने 26 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. देवदत्त पडिक्कलने 25 चेंडूत 26 धावा केल्या. ध्रुव जुरेलने 10 चेंडूत 18 आणि रविचंद्रन अश्विनने तीन चेंडूत 10 धावा करत राजस्थानला विजयाच्या जवळ नेलं. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात 36 धावा करायच्या होत्या. हेटमायर, जुरेल आणि अश्विन यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 Points Table : राजस्थान आणि मुंबईचा विजय, गुणतालिकेत बदल; पॉईंट्स डेबलमधील अपडेट पाहा