IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघावर विजय मिळवला. राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाला 20 षटकांत केवळ 178 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना राजस्थान संघाने शेवटच्या षटकात तीन गडी राखून जिंकला. यासोबतच राजस्थान संघाने गुणतालिकेत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. पण या पराभवानंतर गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने कोलकातावर विजय मिळवला. या विजयासह मुंबई संघाने गुणतालिकेत उडी घेतली आहे. मुंबई संघ नवव्या क्रमांकावरून आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


IPL 2023 Points Table : राजस्थान पहिल्या क्रमांकावर कायम


गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राजस्थान संघ 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. रॉयल्सचा नेट रनरेट 1.354 आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्स संघ आहे. लखनौ संघाचा नेट रनरेट 0.761 आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर गुजरात तिसऱ्या स्थानावर कायम आहे. गुजरातकडे 6 गुण आणि संघाचा नेट रनरेट 0.192 आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर पंजाब किंग्स आहेत. किंग्सचा नेट रनरेट 0.109 आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौ, गुजरात आणि पंजाब संघाकडे प्रत्येकी 6 गुण आहेत पण, नेट रनरेटमुळे संघांचं स्थान बदललं आहे.


IPL 2023 Points Table : मुंबई संघाची गुणतालिकेत उडी


यानंतर आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई, आरसीबी, मुंबई आणि हैदराबाद अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर मुंबई संघाने गुणतालिकेत एका क्रमांकाने उडी घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ शून्य गुणांसह गुणतालिकेत शेवटी आहे. दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे दिल्ली संघ दहाव्या क्रमांकावर आहे.






ऑरेंज कॅप (Orange Cap)


मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावल्यानंतर व्यंकटेश अय्यर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर गेला आहे. त्याने आता पाच सामन्यात 234 धावा केल्या आहेत. शिखर धवनही फक्त एक धावाने मागे आहे. यापूर्वी ऑरेंज कॅप त्याच्याकडे होती. या टॉप 5 फलंदाजाची यादी पाहा



  1. व्यंकटेश अय्यर - 234 धावा

  2. शिखर धवन - 233 धावा

  3. शुभमन गिल - 228 धावा

  4. डेव्हिड वॉर्नर - 228 धावा

  5. विराट कोहली - 214 धावा






पर्पल कॅप (Purple Cap)


पर्पल कॅपच्या यादीत युजवेंद्र चहल 11 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोलंदाजांच्या विकेट्सची संख्याही तितकीच आहे. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतील टॉप 5 खेळाडूंचा यादी पाहा.



  1. युझवेंद्र चहल - 11 विकेट्स

  2. मार्क वुड - 11 विकेट्स

  3. राशिद खान - 11 विकेट्स

  4. मोहम्मद शमी - 10 विकेट्स

  5. रवी बिश्नोई - 8 विकेट्स