हेड-अभिषेक शर्मानं कंडका पाडला, हैदराबादचा 10 विकेटनं विजय, लखनौचा दारुण पराभव
SRH vs LSG: ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दहा विकेटने विजय मिळवलाय.
SRH vs LSG: ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दहा विकेटने विजय मिळवलाय. लखनौने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने 10 विकेट आणि 10 षटके राखून सहज केला. हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी वादळी अर्धशतके ठोकली. दोघांनी बिनबाद 166 धावांचा पाऊस पाडला. पहिल्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. त्याशिवाय सर्वात कमी चेंडूमध्ये धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही हैदराबादच्या नावावर झाला आहे. हैदराबादने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावरही झेप घेत प्लेऑफच्या दिशेने पावले टाकली आहेत.
सनरायझर्स हैदराबादकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी कहर केला. दोघांनी एखाद्या गेमप्रमाणे चौकार-षटकारांची आतषबाजी करत लखनौच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. ट्रॅव्हिस हेड 30 चेंडूत 89 धावा करून नाबाद राहिला. त्यानं 8 चौकार आणि 8 षटकार लगावले. त्यानं 296 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्यानं 8 चौकार आणि 6 षटकार हाणले. त्यानं 267 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली.
लखनौने प्रथम फलंदाजी करताना 165 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. हेड आणि शर्माच्या माऱ्यापुढे लखनौची गोलंदाजी कमकुवत आणि दुबळी दिसत होती. लखनौच्या एकाही गोलंदाजाला हेड आणि शर्मा यांना बाद करता आले नाही. दोघांनी एकही विकेट न जाऊ देता हैदराबादला सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
Travis Head - 89* (30).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2024
Abhishek - 75* (28).
SRH CHASED DOWN 166 IN JUST 9.4 OVERS - THE CRAZIEST CHASE IN HISTORY. 🤯🔥 pic.twitter.com/XUJtmFXAwy
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी 58 चेंडूमध्ये 167 धावांचा पाऊस पाडला. दोघांमुळे लखनौचा एकही गोलंदाज टिकला नाही. अभिषेक शर्मा याने 28 चेंडूमध्ये 75 धावांचा पाऊस पाडला. त्याने 268 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. शर्माने आपल्या वादळी खेळीमध्ये सहा षटकार आणि आठ चौकार ठोकले. तर ट्रेविस हेड यानेही राजस्थानची गोलंदाजी फोडली. ट्रेव्हिस हेड याने 297 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई केली. ट्रेविस हेड याने 30 चेंडूमध्ये आठ चौकार आणि आठ षटकाराच्या मदतीने 89 धावांची वादळी खेळी केली.
After 9 overs:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2024
LSG - 49/2.
SRH - 157/0. pic.twitter.com/V1C0mlq2ti
हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यापुढे लखनौचे सर्वच गोलंदाज अपय़शी ठरले. कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर, रवि बिश्नोई, नवीन उल हक, आयुष बडोनी यांना विकेट घेता आल्या नाही. प्रत्येक गोलंदाजांची धुलाई करण्यात आली.