CSK vs SRH IPL 2025 : टाटा बाय-बाय खत्म! हैदराबादकडून चेन्नईचा टप्प्यात आणून कार्यक्रम, CSK आयपीएल 2025 मधून बाहेर
IPL 2025 Points Table CSK vs SRH : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 'चेपॉकचा बालेकिल्ला' पूर्णपणे ढासळला.

Sunrisers Hyderabad beat Chennai Super Kings by 5 wickets : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 'चेपॉकचा बालेकिल्ला' पूर्णपणे ढासळला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सनंतर सनरायझर्स हैदराबादनेही या मैदानावर विजयाची चव चाखली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने खराब ठरत असलेल्या हंगामात तिसरा विजय मिळवला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हर्षल पटेल आणि कामिंदू मेंडिस यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सनरायझर्सने चेन्नईचा 5 गडी राखून पराभव केला.
A milestone victory 👏#SRH register their first ever win at Chepauk with a strong performance against #CSK 🔝💪
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Scorecard ▶ https://t.co/26D3UampFQ#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/lqeX4CiWHP
नवव्या आणि दहाव्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स आणि चेन्नईसाठी हंगामात त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. सनरायझर्सने यात यश मिळवले आणि चेन्नई स्पर्धेतून जवळपास बाहेर गेली आहे. या हंगामात सनरायझर्सचा 9 सामन्यांतील हा तिसरा विजय आहे आणि संघ पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईचा हा इतक्याच सामन्यांमधील सातवा पराभव आहे आणि संघ दहाव्या क्रमांकावर कायम आहे.
आयुष म्हात्रेच्या वादळी सुरुवात पण...
घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खुपच वाईट झाली, कारण मोहम्मद शमीने शेख रशीदला आऊट करून पहिला झटका दिला. अशाप्रकारे हा तरुण फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला सॅम करन फार काही करू शकला नाही आणि 10 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. पण, आयुष म्हात्रेने पुन्हा एकदा स्फोटक शैली फलंदाजी केली, पण तोही सहाव्या षटकात 47 धावा काढून आऊट झाला. त्यानंतर 19 चेंडूत सहा चौकारांसह 30 धावा केल्या. अशाप्रकारे, पॉवरप्लेमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर सीएसकेने 50 धावा केल्या.
Only a catch like that could’ve stopped that cameo from Brevis! 🤯
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Kamindu Mendis, take a bow 🙇#CSK 119/6 after 14 overs.
Updates ▶ https://t.co/26D3UalRQi#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/NvthsQfpUj
एमएस धोनी पुन्हा ठरला फेल
पॉवरप्लेनंतर चेन्नई सुपर किंग्जचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी अनुभवी रवींद्र जडेजा आणि डेवाल्ड ब्रेव्हिसवर आली. दोघांनीही 24 चेंडूत 27 धावांची भागीदारी केली पण त्यानंतर 21 धावा काढल्यानंतर जडेजा बोल्ड झाला. ब्रेव्हिसने सीएसकेसाठी पदार्पणाच्या सामन्यात काही स्फोटक शॉट मारले, पण नंतर त्याचा कामिंदू मेंडिसने एक चांगला कॅच घेतला. अशाप्रकारे, ब्रेव्हिस 35 चेंडूत एका चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 42 धावा करून आऊट झाला. यानंतर, शिवम दुबे 12 धावा करून त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या कर्णधार एमएस धोनी पण जास्त काही करू शकला नाही आणि 6 धावांवर आऊट झाला. इम्पॅक्ट खेळाडू अंशुल कंबोजही 2 धावा करून आऊट झाला. तर नूर अहमदने 4 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
Shining bright when it mattered ✨
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Harshal Patel is the Player of the Match for his exquisite spell of bowling 🤌
Scorecard ▶ https://t.co/26D3UampFQ#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/EwXV7d4umc
अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड नावाचे वादळ शांत...
सनरायझर्स हैदराबादला 155 धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खलील अहमदने अभिषेक शर्माला बाद केले. अभिषेकला त्याचे खातेही उघडता आले नाही. मैदानावर सहसा वादळ निर्माण करणारा ट्रॅव्हिस हेड देखील शांत राहिला आणि 16 चेंडूत फक्त 19 धावा काढू शकला. हेनरिक क्लासेनही 7 धावा करून आऊट झाल्याने हैदराबादच्या अडचणी वाढत होत्या. पण इशान किशन आणि अनिकेत वर्माच्या 36 धावांच्या भागीदारीमुळे एसआरएचच्या विजयाच्या आशांना पंख मिळाले, परंतु 44 धावा करून किशन बाद झाला. अनिकेत वर्माने 19 धावा केल्या. शेवटी, कामिंदू मेंडिसने 22 चेंडूत नाबाद 32 धावा आणि नितीश रेड्डीने 13 चेंडूत नाबाद 19 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्जकडून नूर अहमदने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
Kamindu Mendis continues to impress 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025
Mendis and Nitish Reddy are going strong as #SRH are getting closer to victory 👏
Updates ▶ https://t.co/26D3UampFQ#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/spoLx6Xjk4





















