SRH vs PBKS LIVE Updates: शेवट गोड! अखेरच्या सामन्यात पंजाबचा विजय, हैदराबादचा पाच विकेट्सनं पराभव

SRH vs PBKS, IPL 2022: आज आयपीएलच्या (IPL 2022) अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 May 2022 10:59 PM
SRH vs PBKS LIVE Updates: शेवट गोड! अखेरच्या सामन्यात पंजाबचा विजय, हैदराबादचा पाच विकेट्सनं पराभव

SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबादच्या संघानं दिलेल्या 161 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला आहे.

SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबादची भेदक गोलंदाजी, पंजाबच्या संघानं तीन विकेट्स गमावले. 

SRH vs PBKS LIVE Updates:  हैदराबादच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघानं खराब सुरुवात झाली आहे. हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. जॉनी बेअरस्टो, शाहरूख खान, मयांक अग्रवाल बाद झाले आहेत. 

SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबादचं पंजाबसमोर 158 धावांचं लक्ष्य

SRH vs PBKS LIVE Updates: अभिषेक शर्माच्या संयमी 43 धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदाराबादनं पंजाबसमोर 20 षटकात 158 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पंजाबकडून नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रारनं आक्रमक गोलंदाजी केली. दोघांनीही प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.

SRH vs PBKS LIVE Updates: पंजाबची भेदक गोलंदाजी, हैदराबादचे चार फलंदाज माघारी 

हैदराबाद आणि पंजाब यांच्यात  आयपीएल 2022 मधील अखेरचा साखळी सामना खेळला जात आहे. हा सामना  औपचारिकता म्हणून खेळला जात आहे. कारण, दोन्ही संघ यंदाच्या हंगामातून बाहेर पडले आहेत. हैदराबादविरुद्ध सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली आहे. सध्या हैदराबादचे चार विकेट्स पडले आहेत. 

SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबादच्या संघानं दुसरी विकेट गमावली

SRH vs PBKS LIVE Updates: पंजाबविरुद्ध सामन्यात हैदराबादच्या संघानं दुसरी विकेट गमावली आहे. राहुल त्रिपाठीच्या रुपात हैदराबादच्या संघाला दुसरा धक्का लागला आहे. त्यानं 18 चेंडूत 20 धावा केल्या. 

SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबादच्या संघाला पहिला धक्का, प्रियम गर्ग आऊट!

पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाला प्रियम गर्गच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. 

SRH vs PBKS LIVE Updates: सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), फजलहक फारूकी, उमरान मलिक.

SRH vs PBKS LIVE Updates: पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन

जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कर्णधार), शाहरुख खान, जितेश शर्मा (विकेटकिपर), हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंह. 

SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबादचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

पंजाब किंग्जविरुद्ध टॉस जिंकून हैदराबादच्या संघान प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएल 2022 मधून दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी औपचारिक म्हणून खेळला जाणार आहे. परंतु, अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

SRH vs PBKS LIVE Updates: हैदराबाद आणि पंजाब याच्यातील सामना कधी, कुठे पाहायचा?

आज 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा खेळवला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.

SRH vs PBKS LIVE Updates: कसा आहे पिच रिपोर्ट?

वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी येथे जास्त आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. खेळपट्टी गोलंदाजाला मदत करेल असा अंदाज आहे. पण दुसऱ्या डावात फलंदजीसाठी पोषक असेल. 

हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड

पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील एकूण सामन्याची आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 19 सामने झाले आहेत. यामध्ये 13 सामन्यात हैदराबादने तर सहा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. दोन्ही संघासाठी हा सामना फक्त औपचारिक आहे. पण या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न पंजाब आणि हैदराबाद करतील, यात शंका नाही. 

पार्श्वभूमी

SRH vs PBKS, IPL 2022: आज आयपीएलच्या (IPL 2022) अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्टात आलेय. अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघ स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं आजचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील एकूण सामन्याची आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 19 सामने झाले आहेत. यामध्ये 13 सामन्यात हैदराबादने तर सहा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. दोन्ही संघासाठी हा सामना फक्त औपचारिक आहे. पण या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न पंजाब आणि हैदराबाद करतील, यात शंका नाही. 

कसा आहे पिच रिपोर्ट?
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी येथे जास्त आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. खेळपट्टी गोलंदाजाला मदत करेल असा अंदाज आहे. पण दुसऱ्या डावात फलंदजीसाठी पोषक असेल. 

कधी, कुठे रंगणार सामना?
आज 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा खेळवला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.

हे देखील वाचा- 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.