India vs Sri Lanka Schedule 2024 : टीम इंडिया टी-20 विश्वचषक  2024 मधील विजयी कामगिरीनंतर आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये टी20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मालिका आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 तून निवृत्ती जाहीर केल्यामुळे या दोघांना संघातून वगळण्यात येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या दौऱ्यासाठी संभाव्य संघ कसा असेल, जाणून घ्या.


टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर


भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दुसरा T20 सामना 28 जुलैला आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 30 जुलैला खेळवला जाईल. हे सर्व T20 सामने संध्याकाळी खेळवले जातील. आतापर्यंत दोन्ही देशांनी या मालिकेसाठी आपापल्या संघांची घोषणा केलेली नाही.


टी20 आणि वनडे मालिका खेळणार


टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 4 ऑगस्टला तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्टला खेळवला जाईल.


T20 मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ 


शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, साई किशोर, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.


टी-20 मालिकेचं वेळापत्रक कसं असेल?



  • पहिला T20 सामना : 27 जुलै

  • दुसरा T20 सामना : 28 जुलै

  • तिसरा T20 सामना : 30 जुलै


एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक 



  • पहिला एकदिवसीय सामना : 2 ऑगस्ट

  • दुसरी एकदिवसीय सामना : 4 ऑगस्ट

  • तिसरी एकदिवसीय सामना : 7 ऑगस्ट


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Team India Celebration : डोळ्यात आनंदाश्रू, हातात विश्वचषक, खांद्यावर तिरंगा; विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पाहा टॉप 10 फोटो