Team India Champion T20 World Cup 2024 : 17 वर्षांची प्रतीक्षा संपवून टीम इंडियाने (Team India) 2007 नंतर विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) अंतिम सामन्यात 76 धावांची विजयी खेळी केली. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 क्रिकेटमधून निवृत्तीची मोठी घोषणा केली.


किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त


कोहली आणि रोहित यांनी टी20  फॉरमॅटमधून रिटायरमेंट घेणे, हा भारतीयांसाठी दुहेरी धक्का होता. कोहली आणि रोहितने टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोहलीने कर्णधार पदावर असताना दमदार कामगिरी केली आहे, तर रोहित शर्माही कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. कोहलीनंतर रोहितला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती, ज्यात तो यशस्वी ठरला. रोहित आणि कोहलीच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. किंग कोहलीने अनेक T20 आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत, जे कोणत्याही खेळाडूला तोडण सोपं नाही. 


रोहित शर्मा अन् विराटची जोडी


विश्वचषकात रोहित शर्माने चांगली कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माने स्वतः फलंदाजी करत आघाडी घेतली. त्यानंतर अंतिम सामन्यात जेव्हा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता त्यांना पेन्शन देणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


विराट-रोहित दोघांना पेन्शन मिळणार


बीसीसीआय (BCCI) भारतीय क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर पेन्शन देते. यासाठी बीसीसीआयचे काही नियम आणि कायदे आहेत. यासाठी खेळाडूंना ठराविक प्रमाणात सामने खेळावे लागतात. त्या आधारे खेळाडूला पेन्शन दिली जाते. बीसीसीआयचा पेन्शन स्लॅब प्रथम श्रेणी सामने आणि कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.


जर एखाद्या खेळाडूने भारतासाठी 25 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले असतील तर त्याला दरमहा 70,000 रुपये पेन्शन म्हणून दिली जाते. तर 25 पेक्षा कमी कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना दरमहा 60,000 रुपये पेन्शन दिली जाती. यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही पेन्शन मिळणार आहे.


बीसीसीआयचा पूर्ण पेन्शन स्लॅब कसा आहे?


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयमध्ये केवळ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठीच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाही पेन्शनची तरतूद आहे. BCCI पेन्शन स्लॅब अंतर्गत, 2003 पूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झालेले आणि 1 ते 74 सामने खेळलेले क्रिकेटपटू.


त्यांना दरमहा ३० हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. 75 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना 45,000 रुपये पेन्शन मिळते. बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंनाही पगार देते. 5 ते 9 कसोटी खेळलेल्यांना 30,000 रुपये दिले जातात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rohit Sharma : T20 विश्वचषकासह हिटॅमनची Good Morning, कर्णधार रोहित शर्मानं शेअर केला ट्रॉफीसोबतचा खास फोटो