(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित, बुमराहसह हे 11 खेळाडू तुम्हाला करतील करोडपती, SRH vs MI संघातील ड्रीम 11
SRH vs MI : आयपीएलच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) आज सनराजयर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.
SRH vs MI, Dream11 Prediction : आयपीएलच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) आज सनराजयर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. दोन्ही संघाला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. आज कोणता संघ आपल्या पहिल्या विजयाची नोंद करतोय, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहे. हैदराबाद येथे होणारा हा सामना नक्कीच रंगतदार होईल. जर तुम्ही आजच्या सामन्यासाठी फॅन्टेसी 11 संघ निवडणार असेल, तर तुम्हाला मार्गदर्शन करणारी बातमी आहे. होय. आम्ही तुम्हाला आजच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूबद्दल सांगणार आहोत.
मुंबई इंडियन्सला पहिल्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. गुजरातने मुंबईचा पराभव केला होता. तर हैदराबादला कोलकात्याने पराभूत केले होते. मुंबई आणि हैदराबादला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. आज कोणता संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय, हे लवकरच समजेल. पण आजच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूची आम्ही निवड केली आहे. तुम्ही फॅन्टेसी टीम लावत असाल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आम्ही दोन संघ निवडले आहेत, मैदान, हेड टू हेड, खेळाडूंची आताची कामगिरी, याआधीची कामगिरी, यावर आधारीत आम्ही 11 जणांची निवड केली आहे. पाहूयात दोन्ही संघ...
आजच्या सामन्यासाठी तुम्ही फॅन्टेसी संघ निवडत असताना फलंदाजांमध्ये रोहित शर्माची निवड करायला अजिबात विसरु नका. याचं कारण म्हणजे सनरायजर्स हैदराबादच्या बॉलिंग लाइनअपविरुद्ध रोहितचा रेकॉर्ड शानदार आहे. रोहित व्यतिरिक्त मयंक अग्रवाल हाही एक चांगला पर्याय आहे, कारण तो गेल्या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. तुम्ही तिलक वर्मालाही संघात ठेवू शकता. कर्णधारपदासाठी रोहित हा सर्वोत्तम पर्याय असेल. एडन मार्करम आणि हार्दिक पांड्या यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करा. हार्दिकनं गेल्या सामन्यात गोलंदाजीची सुरुवात केली होती. यासोबतच तो तुम्हाला बॅटनंही चांगले गुण देऊ शकतो. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहला अजिबात सोडू नका..
विकेटकीपर -
इशान किशन, हेनरिक क्लासेन
फलंदाज -
रोहित शर्मा, तिलक वर्मा, मयांक अग्रवाल
अष्टपैलू -
एढन मार्करन, हार्दिक पांड्या, मार्को यान्सन
गोलंदाज -
जसप्रीत बुमराह, टी नटराजन, गेराल्ड गोएत्जे
कर्णधार - रोहित शर्मा
उपकर्णधार - जसप्रीत बुमराह
----------------------
विकेटकीपर -
हेनरिक क्लासेन (कर्णधार)
फलंदाज -
रोहित शर्मा, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस
अष्टपैलू -
हार्दिक पांड्या, एडन मार्करम, मार्को यान्सन
गोलंदाज
जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), पॅट कमिन्स, गेराल्ड कोएत्जे
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.