SRH vs KKR LIVE Score, IPL 2020: सनरायजर्स हैदराबादचं केकेआरला 143 धावांचं लक्ष्य

SRH vs KKR LIVE Score Updates: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघांमध्ये आयपीएलच्या 13व्या सीजनमधील 8वा सामना होत आहे. या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Sep 2020 10:21 PM
SRH vs KKR LIVE Score Updates: सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांमध्ये चार गड्यांच्या बदल्यात 142 धावा काढल्यात. तर केकेआर संघाला जिंकण्यासाठी 20 षटकांमध्ये 143 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे.

पार्श्वभूमी

SRH vs KKR LIVE Score Updates IPL 2020 LIVE Updates: आईपीएलच्या 13व्या सीजनच्या आठव्या मॅचमध्ये शनिवार कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) चा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत होणार आहे. केकेआरसारखीच हैदराबादला देखील आपल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. केकेआर जवळ टी-20 मधील दिग्गज फलंदाज आंद्रे रसेल आणि इयोन मोर्गन आहे. मधल्या क्रमात कॅप्टन कार्तिक, नीतीश राणा, मोर्गन आणि रसेल यांना आपल्या कामगिरीवर लक्ष द्यावं लागेल. सोबतचं केकेआरला आपल्या गोलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे.

पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाची मधळी फळी कमजोर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कॅप्टन वॉर्नरला याची चिंता आहे. आजच्या मॅचमध्ये पिच फिरकी गोलंदाजांना साथ देण्याची शक्यता आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये ड्यू फॅक्टर पण महत्वाचा ठरणार आहे.


 


सनरायजर्स हैदराबाद संभावित प्लेइंग इलेव्हन: जॉनी बेयरस्टो (विकेटकिपर), डेविड वॉर्नर (कॅप्टन), केन विलियमसन/मोहम्मद नबी, मनीष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी नटराजन.


 


केकेआर: दिनेश कार्तिक (कॅप्टन), आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शुभमन गिल, लॉकी फग्र्यूसन, नीतीश राणा, रिंकू सिंह, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, अली खान, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, सिद्देश लाड, पैट कमिंस, इयोन मोर्गन, टॉम बेंटन, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, एम. सिद्धार्थ, निखिल नाइक, क्रिस ग्रीन.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.