Maharashtra Breaking News Live Updates: महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर राष्ट्रपतींकडून दु:ख व्यक्त

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशातील घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

युवराज जाधव Last Updated: 31 Jan 2025 02:59 PM
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीची छापेमारी; भाईंदरमध्ये खळबळ

भाईंदर : भाईंदर येथील आरएनपी पार्क सोसायटीमधील कृष्णा सागर या इमारतीत राहणाऱ्या एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय (ED) तर्फे आज (31 जानेवारी) सकाळी छापेमारी करण्यात आली. दिल्लीतून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे.


या छाप्याचे नेमके कारण आणि संबंधित प्रकरणाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी ईडीकडून लवकरच अधिक तपशील दिला जाण्याची शक्यता आहे. भाईंदर आणि मुंबई पोलिसांकडून या कारवाईसंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. छापेमारीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, या कारवाईचे नेमके उद्दिष्ट काय आहे, हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अंबरनाथमध्ये शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी; अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबरनाथ: शहरामध्ये शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागातील एका शाळेतील ही घटना आहे. शिक्षक एकादशी राम असे शिक्षकाचे नाव आहे.  पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुवर्ण मुकुटाने गौरव! अमरावतीत प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून जंगी स्वागत

अमरावती : भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दैदिप्यमान यश संपादन केले. त्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर अमरावतीतील त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी भाजप अमरावती शहर अध्यक्ष प्रविण पोटे पाटील यांनी सुवर्ण मुकुट चढवत भव्य सत्कार केला. 


प्रविण पोटे पाटील यांच्या इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयात भव्य स्वागत सोहळा पार पडला. फटाक्यांची आतीषबाजी, फुलांची उधळण करत क्रेनद्वारे हार टाकून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले...

भाजप दर पंधरवड्याला घेणार मंत्र्यांचा क्लास; संघटना मजबुतीचा प्रयत्न

भाजप दर पंधरवड्याला घेणार मंत्र्यांचा क्लास


सरकार मार्फत कामं करताना भाजपचा संघटना मजबुतीचा प्रयत्न


भाजप मंत्र्यांचे दर 15  दिवसांनी रिपोर्ट कार्ड तयार होणार


भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवड्याला आढावा बैठक होणार 


मंत्र्यांनी संघटनेमार्फत आलेली किती लोकोपयोगी कामे मार्गी लावली? याचा आढावा घेणार


मुख्यमंत्र्यांसोबत ही दर तीन महिन्यांनी भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होईल 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आढावा घेणार


मुंबईत गरज भासल्यास भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत


मुंबईतील निरुत्साही सदस्य नोंदणीची भाजपच्या वरिष्ठांकडून गंभीर दखल


आज भाजप प्रदेश कार्यालयात बोलावली तातडीची बैठक


भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबईचा आढावा घेणार 

वन कर्मचाऱ्यांवरील हल्ला आणि वाहन जाळपोळ प्रकरणी 10 जणांना अटक

भंडारा: वाघानं शेतकरी महिलेवर हल्ला करून तिला ठार केलं. वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीला घेवून ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचलेल्या वन कर्मचारी आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणून हिंसक वाळणं दिलं. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला करीत 15 वन कर्मचाऱ्यांना काठ्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर काहींनी वन विभागाचं वाहन पेटवून दिलं. ही घटना गुरुवाररी 30 जानेवारीच्या रात्री भंडाऱ्याच्या कवलेवाडा इथं घडली.


या प्रकरणी आता कारधा पोलीस ठाण्यात वन विभागाचं वाहन जाळणं आणि वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हमला करून शासकीय कामात अडथळा आणणं, असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वाहन जाळणे या गुन्ह्यात 7 जणांना तर वन कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरणी 3 जणांना अशा दोन्ही प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

मोठी बातमी! पुण्यात जीबीएस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू 

पुणे: पुण्यातील नांदेडगावतील 65 वर्ष ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झालाय. या महिलेवर मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत त्यातील हा एक रुग्ण होता. दरम्यान, पुण्यातला हा तिसरा आणि राज्यातला चौथ्या रुग्णाचा मृत्यू झालाय. नांदेड गावातली महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे  काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात उचार सुरु होते. दरम्यान  प्रकृती अजून खराब होताना पाहून कुटुंबाने महिलेला ससून रुग्णालयात दाखल केलं होत. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा आता मृत्यू झालाय. 

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची शक्यता

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करण्याची शक्यता


दिल्लीत महायुतीच्या प्रचारार्थ शिंदे २ फेब्रुवारी रोजी दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती


या आधीही कर्नाटक विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे महायुतीच्या प्रचारासाठी गेले होते

Nitesh Rane : नितेश राणेंच्या वक्तव्यावर अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांची नाराजी

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी बुरख्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आणि अनावश्यक आहे, त्यांनी असे वक्तव्य करू नये, असे मत अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे. 

राष्ट्रपतींकडून कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबद्दल दु:ख व्यक्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले, असं मुर्मू म्हणाल्या.

Kirit Somaiya : किरीट सोमय्या आज पुन्हा मालेगाव दौऱ्यावर 

नाशिक : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर येत आहे. मालेगाव बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना बोगस जन्म दाखले देऊन भारतीय बनविण्याचे केंद्र सुरु असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, एमआयएम आमदार, खासदार यामुळे मला दम देत असल्याचा आरोप त्यांनी सोमय्या यांनी केला आहे. मी मालेगावात येतो, असे प्रति आव्हान त्यांनी एक्सवर दिल्याने त्यांच्या आजच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. दुपारी 1 वाजता ते मालेगावांत येणार असून ते  छावणी पोलिस स्टेशन, शिधा पुरवठा कार्यालय व महापालिकेला भेट देणार आहे.

PM Modi : अधिवेशनात महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय होणार; पीएम मोदींचे वक्तव्य

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, जनतेने मला तिसऱ्यांदा जबाबदारी दिली. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे हे पहिले पूर्ण बजेट आहे. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक मुद्द्यांवर चर्चा होईल. महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय या अधिवेशनात होणार आहेत. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री या अधिवेशनात बघायला मिळणार आहे, असे त्यांनी म्हटले.  

Latur News : प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर : हरंगुळ (बु.) येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते जवळपास ३५० दिव्यांग बांधवांना सहायक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मोटाराईज ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, रोलेटर, सीपीचेअर, श्रवणयंत्र, काठी आदी साधनांचा समावेश होता. या सोहळ्यास भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती. लातूर येथे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक सहायक उपकरणे देण्याची कार्यवाही नियमितपणे सुरू राहील, अशी माहिती यावेळी पालकमंत्री भोसले यांनी दिली.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द 


मुख्यमंत्री कार्यालयाकडून २९, ३० आणि ३१ जानेवारीपर्यंत दिल्ली दौऱ्यावर असल्याची दिली होती अधिकृत माहिती 


मात्र, आजचा मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द 


पुण्यातील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री मुंबईत परतणार 


संध्याकाळी ६ वाजता केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 


सोबतच, कांदिवली पश्चिममध्ये भाजपच्या मेळाव्याला देखील हजेरी लावणार

Nandurbar News : नंदुरबारमध्ये अवैध घरगुती गॅस सिलेंडरचा वापर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

नंदुरबार : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वाहनांमध्ये एलपीजी गॅस भरणाऱ्यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कारवाई केली. 45 गॅस सिलेंडरसह वाहनात गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. 

कर्जत चे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ.

अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यांनंतर हायकोर्टाने हे पुरावे योग्य असल्याचं मान्य केलंय. यामुळे थोरवे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काँग्रेसनं गेल्या 15 वर्षांमध्ये दलित अन् मागासवर्गीयांचा विश्वास गमावला : राहुल गांधी 

काँग्रेसनं गेल्या 15 वर्षांमध्ये दलित अन् मागासवर्गीयांचा विश्वास गमावला : राहुल गांधी 


काँग्रेसनं गेल्या 15 वर्षात दलित, मागासवर्गीयांसाठी पुरेसं काम केल नाही


दलित अन् मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवण्यात पक्ष अपयशी


हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल करणार 


इंदिरा गांधी आपल्यासाठी लढतील हा विश्वास दलित अन् मागासवर्गीयांमध्ये होता : राहुल गांधी 

संसदेच्या अधिवेशनापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीत एनडीए मित्रपक्षांची विरोधकांना साथ 

संसदेच्या अधिवेशनापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीत एनडीए मित्रपक्षांची विरोधकांना साथ 


एक देश एक निवडणुकीवर सविस्तर चर्चेची मागणी 


जदयूच्या संजय झा यांची सरकारकडे मागणी 


तेलुगु  देसम पार्टीची 18 व्या लोकसभेतील बैठक व्यवस्थेवर नाराजी


कुंभमेळा चेंगराचेंगरीमुळं योगी आदित्यनाथ विरोधकांच्या निशाण्यावर

महाराष्ट्रातील 1 लाख मुस्लीम नागरिक भाजपचे सदस्य 

महाराष्ट्रातील 1 लाख मुस्लीम नागरिक भाजपचे सदस्य 


देशभरात 44 लाख मुस्लीम भाजपचे सदस्य 


भाजप अल्पसंख्यांक सेलच्या  जमाल सिद्दिकी यांची माहिती


उत्तर प्रदेशात मुस्लीम सदस्यांची संख्या 6 लाखांवर

भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर

बांग्लादेशी घुसखोरांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या करणार नाशिक दौऱ्यावर


नाशिक येथे प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची सोमय्या घेणार भेट 


तर दुपारी 12 वाजता मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध करणार FIR 


दुपारी 1 वाजता महापालिका आयुक्त व रेशनिंग आयुक्त मालेगाव यांची घेणार भेट

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार

 संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स साठी एबीपी माझाच्या वेबसाईटला भेट द्या.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.