IPL 2022:  पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादसमोर (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) धावांचं 203 लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स  गमावून 202 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डी कॉन्वेनं (Devon Conway) आक्रमक फलंदाजी करत दिल्लीच्या संघासमोर विशाल धावांचा डोंगर उभा केला. 


नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या संघाची सुरुवात चांगली झाली. चेन्नईचे सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडनं पहिल्या विकेट्ससाठी 182 धावांची भागेदारी केली. परंतु, आठराव्या षटकात टी नजराजनच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडनं आपली विकेट्स गमावली. केवळ एका धावानं ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं. तो 99 धावांवर बाद झाला. त्यानंतर दोन षटक शिल्लक असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. परंतु, मोठे फटके मारण्याच्या नादात तोही बाद झाला. ऋतुराज गायकवाडसहं सलामी देण्यासाठी आलेल्या डेव्हॉन कॉन्वेनं चांगली फलंदाजी केली. त्यानं 55 चेंडूत नाबाद 85 धावा केल्या. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं हैदराबादसमोर 203 धावांचं लक्ष्य ठेवलं. हैदराबादकडून टी नटराजननं दोन विकेट्स घेतल्या.
 
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.


सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: 
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन. 


हे देखील वाचा-