IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग 2022 हंगामाचा पहिला टप्पा पार पडला असून आता दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. याचदरम्यान, शनिवारी चेन्नईच्या चाहत्यांना आश्चर्यचकीत करणारी गोष्ट घडली. यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघाची जबाबदारी संभाळणाऱ्या रविंद्र जाडेजानं कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. तर, महेंद्रसिंह धोनीकडं पुन्हा संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. चेन्नईच्या उर्वरित सामन्यात धोनी चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी धोनीकडं सोपवण्यात आल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ उर्वरित सामने जिंकणार, अशी भविष्यवाणी त्यानं केली आहे.


रवींद्र जाडेजा नेतृत्वात चेन्नईच्या संघानं यंदाच्या हंगामात 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे. धोनीकडं चेन्नईचं कर्णधारपद सोपवल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं मोठी प्रतिक्रिया देत म्हणाला की, धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ उर्वरित सहा सामने जिंकेल. चेन्नईनं त्यांच्या उर्वरित सहा सामन्यात विजय मिळवल्यास संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. 


वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
क्रिकबझशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, , "मी 2005 पासून त्याच्यासोबत आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटमध्ये बदल झालेला मी पाहिला आहे.आम्ही आमच्या नियंत्रणात असलेले सामने गमावले आहेत. परंतु, धोनीच्या नेतृत्वात पराभवाच्या उंबरठ्यावर असलेले सामने जिंकले आहेत. 2008 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतानं ऑस्ट्रेलियाला 2-0 च्या फरकानं पराभूत करत मालिका जिंकलीॉ. आम्ही कधीच असा विचार केला नव्हती की आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात हरवू. त्यानंतर आम्ही अनेक आयसीसी नॉकआऊट सामने जिंकले. धोनीच्या नेतृत्वात मायदेशात मालिका जिंकल्या, ज्या आम्ही गमवायचो."


महेंद्रसिंग धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल, अशी अटकळ होती. त्यामुळx त्याने जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला. परंतु, जाडेजा आपली छाप सोडू शकला नाही, त्यामुळं धोनीकडं पुन्हा एकदा चेन्नईच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली.


हे देखील वाचा-