IPL 2022: सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 46 वा सामना खेळला जाणार आहे. पुण्याच्या  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम चेन्नईच्या संघासाठी खास ठरला नाही. चेन्नईनं 8 सामन्यापैकी 6 सामने गमावले आहे. शनिवारी रवींद्र जाडेजानं चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. ज्यामुळं चेन्नईच्या उर्वरित सामन्यात महेंद्रसिंह धोनी संघाचं नेतृत्व करणार आहे. दुसरीकडं केन विल्यमसनच्या नेतृत्वात हैदराबादनं 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हेड टू रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स (SRH vs CSK) हे संघ 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं कमालीचं जड राहिलं आहे. त्यांनी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 5 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.


कधी, कुठे पाहणार सामना?
सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना 1 मे रोजी  पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.30 वाजता सुरू होईल. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज  यांच्यातील टी -20 सामन्याचे प्रसारण स्टार नेटवर्कवर होईल.हॉटस्टार डॉट कॉमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील यांच्यातील सामन्याचे थेट ऑनलाईन प्रसारण तुम्ही पाहू शकता. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: 
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन. 


चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन:
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.