IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघानं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात गुजरातच्या संघानं नऊ पैकी आठ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, केवळ एकाच सामन्यात गुजरातच्या संघाला पराभव पत्कारावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत 16 गुणांसह गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे. तसेच प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हार्दिक पांड्याचा संघ एक विजय दूर आहे. गुजरातनं त्यांच्या मागच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाला पराभूत करून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सची ऐतिहासिक कामगिरी
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम केलाय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरातच्या संघानं सुरूवातीच्या आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. त्याच्याआधी इतर कोणत्याही संघाला ही कामगिरी करता आली नाही. यापूर्वी राजस्थान रॉयल्स (2008) आणि गुजरात लायन्स (2016) यांनी सात सामने खेळून पहिल्या सहा सामन्यात विजय मिळवला होता.
आयपीएलच्या सुरुवातीच्या आठ सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ-
संघ | विजय | हंगाम |
गुजरात टायटन्स | 7 | 2022 |
राजस्थान रॉयल्स | 6 | 2008 |
गुजरात लायन्स | 6 | 2016 |
गुजरातच्या संघाचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित
गुजरातच्या संघाने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. या हंगामात गुजरातनं आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी आठ सामने जिंकले आहेत. तर, केवळ एकच सामना गमावला आहे. संघाच्या यशामागे हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांचा मोठा हात आहे. या खेळाडूंनी कठीण काळात संघाला विजय मिळवून दिला आहे.
हे देखील वाचा-