RR vs LSG, IPL 2023 Live : लखनौचा राजस्थानवर विजय

RR vs LSG ; आयपीएल 2023 मध्ये पाच पैकी चार सामने जिंकून राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 19 Apr 2023 11:18 PM
लखनौचा राजस्थानवर विजय

लखनौचा राजस्थानवर विजय

राजस्थानला आणखी एक धक्का, हेटमायर बाद

राजस्थानला आणखी एक धक्का, हेटमायर बाद

राजस्थानला मोठा धक्का, जेस बटलर बाद

राजस्थानला मोठा धक्का, जेस बटलर 40 धावांवर बाद

RR vs LSG, IPL 2023 Live : संजू सॅमसनही तंबूत परतला

RR vs LSG, IPL 2023 Live :  यशस्वी जायस्वाल 44 धावांवर बाद झाला.. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही तंबूत परतला

राजस्थानची दमदार सुरुवात

राजस्थानची दमदार सुरुवात.... जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांची वादळी खेळी

लखनौची 154 धावांपर्यंत मजल

लखनौची 154 धावांपर्यंत मजल

स्टॉयनिसला बाद करत संदीप शर्माने लखनौला दिला धक्का

स्टॉयनिसला बाद करत संदीप शर्माने लखनौला दिला धक्का

लखनौची फलंदाजी ढेपाळली

केएल राहुल याने 32 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तर काइल मेयर्स याने 42 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर लखनौची फलंदाजी ढेपाळली. आयुष बडोनी 1, दीपक हुड्डा 2 धावांवर तंबूत परतले.

लखनौचा डाव ढेपाळला

राहुल-मेयर्स बाद झाल्यानंतर लखनौचा डाव ढेपाळला

लखनौची आक्रमक सुरुवात, राहुल-मायर्सने धुतले

लखनौची आक्रमक सुरुवात, राहुल-मायर्सने धुतले... 


 


लखनौ बिनबाद 75 धावा

लखनौ सात षटकात बिनबाद 42 धावा

लखनौ सात षटकात बिनबाद 42 धावा

लखनौची संयमी सुरुवात

लखनौची संयमी सुरुवात.. राहुल-काइलची दमदार खेळी

बोल्टने पहिले षटक निर्धाव टाकले

बोल्टने पहिले षटक निर्धाव टाकले.. राहुल-मेयर्स मैदानावर

लखनौ सुपर जायंट्स प्लेईंग 11

केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युद्धवीर सिंह चरक, नवीन उल हक आणि रवि बिश्नोई.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग 11

जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.

RR vs LSG IPL 2023 : राजस्थान की लखनौ कोण मारणार बाजी?

आयपीएल 2023 मध्ये पाच पैकी चार सामने जिंकून राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान संघाने मागील तीन सामने जिंकून हॅटट्रिक मारली आहे. त्यानंतर लखनौ राजस्थान विरोधात मैदानात उतरणार आहे. लखनौने शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सला दोन गडी राखून पराभूत केलं होतं. यंदाच्या आयपीएलमधील आघाडीच्या दोन संघांमध्ये आजचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सवाई मानसिंग स्टेडियमवरील हा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर फक्त एकच टी20 सामना खेळला गेला आहे. ही खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.

LSG vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थान संघाचं पारड जड दिसून आलं आहे. राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला एकही सामने जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

पार्श्वभूमी

RR vs LSG, IPL 2023 Live : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 26 वा सामना (LSG vs RR) बुधवारी, 19 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात पाहायला मिळणार आहे. राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान आणि लखनौ यांच्यात लढत पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामात राजस्थान संघ सुरुवातीपासूनच चांगल्या स्थितीत आहे. आयपीएल 2022 पासून राजस्थानने आपला चमकदार फॉर्म सुरू ठेवला आहे. 


RR vs LSG IPL 2023 : राजस्थान की लखनौ कोण मारणार बाजी?
आयपीएल 2023 मध्ये पाच पैकी चार सामने जिंकून राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान संघाने मागील तीन सामने जिंकून हॅटट्रिक मारली आहे. त्यानंतर लखनौ राजस्थान विरोधात मैदानात उतरणार आहे. लखनौने शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सला दोन गडी राखून पराभूत केलं होतं. यंदाच्या आयपीएलमधील आघाडीच्या दोन संघांमध्ये आजचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.


LSG vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थान संघाचं पारड जड दिसून आलं आहे. राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला एकही सामने जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सवाई मानसिंग स्टेडियमवरील हा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर फक्त एकच टी20 सामना खेळला गेला आहे. ही खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.


MI vs SRH, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) यांच्यात 18 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअम संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.