Who Is Yash Dayal: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक नव्या चेहऱ्यांनी दमदार कामगिरीच्या जोरावर आपली छाप सोडली आहे. दरम्यान, तिलक वर्मा, आयुष बदोनी, अभिनव मनोहर, वैभव अरोडा यांच्यासारख्या या युवा खेळाडूंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या यादीत गुजरात टायटन्सचा युवा गोलंदाज यश दयाल याच्या नावाचाही समावेश झालाय. त्यानं राजस्थानविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. ज्यामुळं सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. तर, यश दयाल कोण आहे? त्याचा आयपीएलपर्यंतचा प्रवास कसा होता? हे जाणून घेऊयात.
गुजरातचा डावखुरा वेगवान गोलंदाजानं राजस्थानविरुद्ध सामन्यातून आयपीएलमध्ये पदापर्ण केलं. या सामन्यात त्यानं राजस्थानच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानं सर्वात पहिलं राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिकलला आऊट केलं. त्यानंतर रासी व्हेन आणि युजवेंद्र चहलला आपल्या जाळ्यात अडकवलं.
वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं ठरवलं
यश दयालचा जन्म 13 डिसेंबर 1997 रोजी प्रयागराज येथे झाला. तो आपलं राज्य उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याच्याबद्दल आणि त्याच्या खेळीबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत तो भारतीय संघाच्या बायो बबलचा भाग होता. यश दयालनं आठ वर्षातचं क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं ठरवलं होतं. यशनं भारतीय संघासाठी क्रिकेट खेळावं,असं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. यश दयालचे वडीलही त्यावेळी गोलंदाजी करायचे. परंतु, कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यानं त्यांना क्रिकेट सोडवं लागलं.
यश दयालला खरेदी करण्यासाठी बंगळुरू, कोलकातानं उत्सुकता दाखवली
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं त्याला 3 कोटीत खरेदी केलं होतं. त्याची मूळ किंमत 20 लाख होती. ऑक्शनमध्ये त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सनंही उस्तुकता दाखवली होती.
यश दयालची कारकिर्द
24 वर्षीय यश दयालने सप्टेंबर 2018 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यूपीसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी या युवा खेळाडूनं रणजी करंडकातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर यश दयाल फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे यूपीसाठी टी-20 पदार्पण करण्यात यशस्वी झाला.
राजस्थानविरुद्ध गुजरातचा 37 धावांनी विजय
आयपीएल 2022 च्या 24 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातनं 20 षटकांत चार विकेट्स गमावून राजस्थान रॉयल्ससमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. संघाच्या वतीनं कर्णधार हार्दिक आणि अभिनव मनोहर यांच्यात 55 चेंडूत 86 धावांची शानदार भागीदारी केली. राजस्थानला पराभूत करून गुजरातच्या संघानं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत आहेत.
हे देखील वाचा-