IPL 2022 GT vs RR : गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT) सामन्यात राजस्थान रॉयल्सला (RR) 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) अवघ्या 11 धावावर बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) धावबाद केलं. यावेळी पांड्याने केलेला थ्रो इतका वेगवान होता की त्यामुळे स्टंमचे दोन तुकडे झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत गुजरातने राजस्थानसमोर 193 धावांचे लक्ष्य उभं केलं. प्रत्युत्तरादाखल संजू सॅमसन संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने 11 चेंडूत 11 धावा केल्या. आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू धाव घेण्यासाठी धावला. त्याचवेळी काही अंतरावर उभ्या असलेल्या पांड्याने चेंडू वेगाने स्टंपच्या दिशेने फेकला. हा थ्रो इतका वेगवान होता की संजू धावबाद झालाच त्याचबरोबर मधल्या स्टंमचेही दोन तुकडे झाले.






 


या सामन्यात गुजरातने 20 षटकांत 192 धावा केल्या. यावेळी हार्दिकने नाबाद 87 धावांची दमदार खेळी केली. अभिनव मनोहरनेही 43 धावांचे योगदान दिले. तर मिलरने नाबाद 31 धावा केल्या. 193 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ केवळ 155 धावा करू शकला. राजस्थानकडून जोस बटलरने 54 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. हेटमायरने 29 धावा केल्या. त्याने 17 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha