IPL 2022 Points Table 2022 : कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) वादळी अर्धशतकानंतर लॉकी फर्गुसन आणि यश दयाल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने राजस्थानचा काल खेळल्या गेलेल्या सामन्यात 37 धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह IPL 2022 च्या गुणतालिकेत गुजरात टायटंसचा संघ टॉपवर पोहोचला आहे. गुजरात नंबर एक वर तर कोलकाताचा संघ नंबर दोनवर आहे. 

पॉइंट्स टेबलमध्ये आता गुजरात 5 सामन्यात 4 सामने जिंकत 8 गुणांसह टॉपवर आहे. तर दुसऱ्या नंबरपासून सहाव्या नंबरपर्यंतच्या संघांनी प्रत्येकी 6-6 पॉईंट घेतले आहेत. यात कोलकाता नेट रनरेटच्या आधारे नंबर दोनवर आहे. राजस्थान तिसऱ्या, पंजाब चौथ्या, लखनौ पाचव्या तर बंगळुरु सहाव्या नंबरवर आहे. दिल्ली 4 गुणांसह सातव्या नंबर आहे तर हैदराबाद देखील 4 गुणांसह आठव्या नंबरवर आहे. चेन्नई दोन गुणांसह नवव्या नंबरवर आहे तर मुंबईला पाच सामन्यांमध्ये अद्यापही गुणांचं खातं उघडता आलेलं नाही. 

आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले गेले आहेत.  DC आणि SRH नं प्रत्येकी 4-4 सामने खेळलेत तर बाकी सर्व संघांनी प्रत्येकी 5-5 सामने खेळले आहेत. 

राजस्थानच्या खेळाडूंकडे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा कब्जा आहे. जोस बटलरनं पाच सामन्यात 272 धावा करत ऑरेंज कॅप राखली आहे तर युजवेंद्र चहलनं 12 विकेट्स घेत  पर्पल कॅपवर कब्जा मिळवला आहे. 

IPL 2022 प्वाईंट्स टेबल:

नंबरटीमसामनेविजयपराभवनेट रन रेटपॉईंट्स
1GT5410.4508
2KKR5320.4466
3RR5320.3896
4PBKS5320.2396
5LSG5320.1746
6RCB5320.0066
7DC4220.4764
8SRH422-0.5014
9CSK514-0.7452
10MI505-1.0720
सर्वाधिक धावा जोस बटलरच्या
नंबरफलंदाजसामनेधावा
1जोस बटलर5272
2हार्दिक पांड्या5228
3शिवम दुबे5207

पर्पल कॅपवर युजवेंद्र चहलचा कब्जा

नंबरगोलंदाजसामनेविकेट
1युजवेंद्र चहल512
2उमेश यादव510
3कुलदीप  यादव410