Rinku Singh, GT vs KKR, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans) अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. या सामन्यात कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला रिंकू सिंह (Rinku Singh). त्याने शेवटच्या षटकात दमदार खेळी केली आणि गुजरातच्या जबड्यातून सामना हिरावून घेतला. रिंकू सिंहने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारत अक्षरक्ष: धावांचा पाऊस पाडला. 25 वर्षीय रिंकू सिंहने गुजरातच्या यश दयालच्या चेंडूवर हे पाच षटकार ठोकत धमाकेदार खेळी केली.
रिंकू सिंहची धमाकेदार कामगिरी
रविवारी (9 एप्रिल) नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहने कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. रिंकू सिंहने कोलकाता नाइट रायडर्सला गुजरात टायटन्सविरुद्ध रोमांचक सामन्यात विजय मिळवून दिला. अलिगढचा रहिवासी असलेल्या रिंकूने गुजरात टायटन्सला आयपीएल 2023 मधील पहिल्या पराभवाची चव चाखायला लावली.
रिंकू सिंहने ठोकले सलग पाच षटकार
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2023 च्या सामन्यात गुजरात टायटन्सला शेवटच्या चेंडूवर पराभवाला सामोरं जावं लागलं. दोन वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रिंकू सिंहच्या जोरावर तीन गडी राखून हा सामना जिंकला. रिंकूने शेवटच्या षटकात लागोपाठ 5 षटकार ठोकले. आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात एवढ्या धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून दिला सामना
सामन्याच्या शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 29 धावांची गरज होती. यश दयालच्या त्या षटकात पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एक धाव घेत रिंकू सिंहला स्ट्राइक दिली. यानंतर विजयासाठी पाच चेंडूत 28 धावांची गरज होती. त्यानंतर डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला आणि गुजरात संघ पाहतच राहिला. रिंकू सिंहने 21 चेंडूत 6 षटकार आणि एक चौकारासह 48 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या शेवटच्या षटकात पहिल्यांदाच इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :