IPL 2023 Yavatmal Latest News update : देशभरात सध्या आयपीएलचा फिवर सुरु आहे. प्रत्येक क्रीडाप्रेमी आयपीएलचे सामने पाहत आहे. रंगतदार सामन्याचा उत्साह क्रीडाप्रेमींमध्ये आहे. आयपीएलवर काही ठिकाणी सट्टा लावला जात असल्याचे समोर आले आहे. यवतमाळमध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यवतमाळमधील डोर्ली शेतशिवारात शेतशिवाराज सट्टेबाजार सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल सट्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 


 राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपीटल या आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान यवतमाळ शहरात सट्टा खेळविणाऱ्या चौघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. शेतशिवारात हा सट्टा लावण्याचा प्रकार सुरु होता. पोलिसांनी सट्याचे साहित्य व रोख असा एकूण 84 हजारांचा मुदे्माल जप्त केला आहे. ही कारवाई  यवतमाळ शहरालगत असलेल्या डोर्ली शेतशिवारात करण्यात आली.  नंदलाल उर्फ बंटी गयाप्रसाद जयस्वाल राहणार बोदड, यवतमाळ, शेख रहिम उर्फ गव्वर शेख जमाल रा.  तारपुरा यवतमाळ, गजानन लखनलाल यादव रा. तारपुरा यवतमाळ,  निलेश पिपराणी रा. यवतमाळ असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील निलेश पिंपराणी हा फरार असून तिघांना अटक करण्यात आली आहे.


डोर्ली शेत शिवारात निलेश पिपराणी हा नंदलाल उर्फ बंटी जयस्वाल याचे मार्फतीने गिऱ्हाईकांना जिबी एक्सचेंज नावाचे आयडी व पासवर्ड देवून राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल या आयपीएल क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपणावर क्रिकेट सट्टा लावत होते.   या माहितीची शहनिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डोर्ली शेतशिवारात  धाड टाकली. तेव्हा घटनास्थळावर नंदलाल उर्फ बंटी, शेख रहिम हे दोघेही लोकांकडून क्रिकेट सटटयाचे आकडयांवर पैशाचे सौदे स्विकारतांना दिसले. यावेळी पंचासमक्ष पोलिसांनी क्रिकेट सट्टा खायवाडीचे 12 हजार 470 रुपये रोख, चार मोबाईल 22 हजार, सट्टा जुगाराचे खायवाडी केलेल्या आकडे लिहीले दोन कागदे, दोन पेन, एक बजाज डिस्कव्हर दुचाकी वाहन असा एकूण 84 हजार 490 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी जिबी एक्सचेंज नावाने आयडी ही निलेश पिपराणी याने पुरवला तर गजानन यादव यांनी शेत दिल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरुध्द  यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


आणखी वाचा :


GT vs KKR Match Highlights : कोलकात्याचा थरारक विजय! सलग 5 षटकार लगावत रिंकू सिंहने गुजरातला हरवले