गुजरातचा विजयरथ थांबला, कोलकात्याचा थरारक विजय!
GT vs KKR Match Highlights : अखेरच्या षटकात लागोपाठ पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेंकटेश अय्यर याने विस्फोटक अर्धशतक झळकावत इम्पॅक्ट पाडला होता, त्यानंतर अखेरच्या षटकात रिंकूने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला.
कोलकात्याचा हा सलग दुसरा विजय होय.. तर गुजरातचा यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय होय.
गुजरातने दिलेले 205 धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार राशिद खान याने हॅट्ट्रिक घेतली.
205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज गुरबाज आणि नारायण जगदिशन झटपट बाद झाले. गुरबाज 15 तर जगदिशन याने 6 धावांची खेळी केली. त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला.
नीतीश राणा येन 45 धावांची झटपट खेळी केली. या खेळीत राणा याने 3 षटकार आणि चार चौकार लगावले. तर वेंकटेश अय्यर याने 83 धावांची खेळी केली. या खेळीत वेंकटेश अय्यर याने पाच षटकार आणि आठ चौकार लगावले.
वेंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव कोसळळा. एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. राशिद खान याने हॅट्ट्रिक घेत गुजरातच्या विजयाच्या आशा उंचावल्या. आंद्रे रसेल, नारायण आणि शार्दूल ठाकूर यांना राशिद खान याने तंबूचा रस्ता दाखवला.
हा सामना कोलकात्याच्या हातून गेला असेच वाटत होते. पण अखेरच्या षटकात रिंकू सिंह याने करिश्माई फलंदाजी केली. यश दयाल याच्या अखेरच्या पाच चेंडूवर रिंकू सिंह याने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला.
दरम्यान, प्रथम फंलदाजी करताना साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 204 धावांपर्यंत मजल मारली. विजय शंकर याने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विजय शंकर याने 24 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी केली.