IPL 2023 Updated Points Table : आयपीएल 2023 (Indian Premier League) मध्ये रविवारी रोमांचक सामने पाहायला मिळाले आहे. गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्सचा (PBKS) विजयरथ थांबला आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने (SRH) पहिला विजय मिळवून खातं उघडलं आहे. पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद संघाने केवळ 17.1 षटकांत 144 धावांचं लक्ष्य गाठलं आणि या मोसमातील पहिला विजय मिळवला. संघाचा नेट रनरेटही सुधारला आहे.


रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) गुजरात टायटन्सचा (GT) आणि सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) पंजाब किंग्सचा (PBKS) पराभव झाला. गुजरात टायटन्सचा आणि पंजाब किंग्सचा आयपीएल 2023 मधील हा पहिला पराभव आहे. या आधीचे दोन्ही सामने या संघांनी जिंकले होते. आता गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद संघ 2 गुणांसह थेट आठव्या स्थानावर पोहोचला आहे. संघाचा नेट रनरेट -1.502 आहे.


राजस्थानच्या संघाचं पहिलं स्थान कायम


आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 14 सामने खेळवण्यात आले आहेत. यानंतर गुणतालिकेमध्ये राजस्थान रॉयल्स संघ 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. यामध्ये त्यांचा नेट रनरेट 2.067 इतका आहे. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. 




कोलकाताने रोमहर्षक सामन्यात गुजरातचा 3 गडी राखून पराभव केल्यानंतर, कोलकाता संघाने आता गुणतालिकेत 4 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. संघाचा नेट रनरेट 1.375 आहे. लखनौ सुपर जायंट्स संघ 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.


सध्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून पाचव्या स्थानावर आहे. संघाचा नेट रनरेट 0.356 आहे. यानंतर सहाव्या स्थानावर पंजाब किंग्सचा आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर पंजाब संघाकडे 4 गुण असून संघाचा नेट रनरेट -0.235 घसरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 2 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. गुजरातवर विजय मिळवून हैदराबाद आठव्या स्थानावर पोहोचला आहे.


सध्या, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ पॉइंट टेबलवर शेवटच्या दोन स्थानावर आहेत. या दोन्ही संघांना त्यांचं खातं उघडता आलेलं  नाहीय. आतापर्यंत या दोन्ही संघांनी एकही सामना जिंकलेला नाही. मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट सध्या -1.394 आहे तर दिल्लीचा -2.092 आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


SRH vs PBKS, Match Highlights : हैदराबादचा पहिला विजय, धवनची शिखर खेळी व्यर्थ, पंजाबचा आठ विकेटने पराभव