RCB vs SRH IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना
RCB vs SRH IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादचा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानात रंगणार आहे.
हैदराबादचा 25 धावांनी विजय.. आरसीबीचा सहावा पराभव
दिनेश कार्तिक बाद झाला.. 35 चेंडूत 83 धावांची खेळी करत कार्तिक बाद झाला.
दिनेश कार्तिकडून हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई... कार्तिक 32 चेंडूवर 77 धावा काढून खेळत आहे.
पॅट कमिन्सने आरसीबीला दिला सहावा धक्का.... महिपाल लोमरोर बाद..
10 षटकांत 122 धावांमध्ये आरसीबीचा अर्धा संघ तंबूत परतलाय. आरसीबीला 60 चेंडूमध्ये 166 धावांची गरज
फाफ डु प्लेसिसच्या रुपाने आरसीबीला चौथा धक्का बसलाय. डु प्लेलिसने 28 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली.
रजत पाटीदारच्या रुपाने आरसीबीला तिसरा धक्का बसलाय. पाटीदार 5 चेंडूमध्ये 9 धावा काढून बाद झाला. मयांक मार्कंडेयनं घेतली दुसरी विकेट
विल जॅक्स विचित्र पद्धतीनं धावबाद झाला... फाफनं स्ट्रेट ड्राईव्ह मारला, चेंडूला गोलंदाजाचा हात लागला अन् स्टम्पवर जाऊन आदळला.
288 धावांचा पाठलाग करताना आरसाबीकडून शानदार सुरुवात करण्यात आली आहे. फाफ डु प्लेलिस यानं 23 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं.
विराट कोहलीच्या रुपाने आरसीबीला पहिला धक्का बसला...
ट्रेविस हेडचं वादळी शतक, हेनरिक क्लासेनच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर हैदराबादनं आरसीबीविरोधात 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 287 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादनं यंदाच्या हंगामात आपलाच विक्रम मोडीत काढला. मुंबईविरोधात हैदराबादनं 276 धावांचा डोंगर उभारला होता. आज हा विक्रम मोडीत निघालाय. हैदराबादकडून सलामी फलंदाज ट्रेविस हेड यानं 102 धावांची झंझावती खेळी केली. तर हेनरिक क्लासेन यानं 67 धावांची वादळी खेळी केली. आरसीबीकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. प्रत्येक गोलंदाजानं खराब गोलंदाजी केली. आरसीबीला विजयासाठी तब्बल 288 धावांचं आव्हान मिळालं आहे.
हैदराबादची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या....
हेनरिक क्लासेनच्या रुपाने हैदराबादला तिसरा धक्का बसलाय. क्लासेन यानं 31 चेंडूमध्ये 67 धावांची खेळी केली.
हेनरिक क्लासेनंचं शानदार अर्धशतक.. 24 चेंडूमध्ये ठोकल्या 56 धावा
ट्रेविस हेडनंतर हेनरिक क्लासेनकडून वादळी फलंदाजी सुरु आहे. क्लासेन यानं 22 चेंडूमध्ये 44 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या बाजूला एडन मार्करमही फटकेबाजी करत आहे.
हेड बाद झाला... हैदराबादला दुसरा धक्का
ट्रेविस हेडनं 39 चेंडूमध्ये शतकी खेळी केली.
ट्रेविस हेडकडून आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार
अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का बसला
ट्रेविस हेड यानं अवघ्या 20 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं.
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी वादळी सुरुवात केली आहे. सहा षटकांमध्ये 76 धावांचा पाऊस पाडला
फाफ डु प्लेलिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, सौरव चौव्हाण, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोरर, रीस टोप्ली, विजयकुमार वैशाख, लॉकी फर्गुसन, यश दयाल
राखीव खेळाडू - प्रभुदेसाई, अनुज रावत, स्वप्निल, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा
ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाद अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी नटराजन
राखीव खेळाडू - उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंह, मयांक मार्केंड, राहुल त्रिपाठी
करो या मरो च्या सामन्यात आरसीबीनं संघात दोन मोठे बदल केले आहेत. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना बेंचवर बसवण्यात आले आहे. मॅक्सवेल आणि सिराज यांना यंदाच्या हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेल गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला तर गोलंदाजीमध्ये सिराजला प्रभावी मारा करता आला नाही. आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये लॉकी फर्गुसनला स्थान दिलेय. भन्नाट फॉर्मात असणाऱ्या हैदराबाद संघामध्ये कोणतेही बदल कऱण्यात आले नाहीत. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.
फाफ डु प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादचा संघ प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
आरसीबी आणि हैदराबाद सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. आरसीबीसाठी आजचा सामना करो या मरो असा असेल.. आजच्या सामन्यात पराभूत झाल्यास आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असते. या मैदानात नेहमी धावांचा पाऊस पडताना दिसतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या संघांनी सहज विजय मिळवला आहे. 25 मार्च रोजी झालेल्या सामन्यात, बेंगळुरूने लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबविरुद्ध विजय नोंदवला. यानंतर कोलकाताने आरसीबीविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करत 29 मार्च रोजी खेळलेला सामना जिंकला.
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग, मयंक अग्रवाल
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप, सौरव चौहान, सुयश प्रभू , स्वप्नील सिंग, राजन कुमार, कर्ण शर्मा, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत, मनोज भंडागे, यश दयाल, हिमांशू शर्मा
पार्श्वभूमी
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -