RCB vs LSG IPL 2025: दिग्वेश राठीने केला होता गेम, ऋषभ पंतचा एक निर्णय अन् बंगळुरुच्या कर्णधाराची भर मैदानात मिठी, VIDEO
RCB vs LSG IPL 2025: बंगळुरुला विजयासाठी 19 चेंडूत 29 धावांची आवश्यकता असताना लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीने मोठा डाव खेळला होता.

RCB vs LSG IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात झालेल्या बंगळुरुने 6 विकेट्सने विजय मिळवला. या शानदार विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आणि आता ते गुरुवारी पंजाबविरुद्ध खेळतील. या लढतीतील विजेता थेट अंतिम फेरी गाठेल.
4⃣ fantastic teams
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
1⃣ road to glory 🏆
Which teams will make the final? ✍👇#TATAIPL | #TheLastMile pic.twitter.com/99dOog7GBu
कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर लखनौने 20 षटकांत 3 बाद 227 धावा उभारल्या. मात्र, कर्णधार जितेश शर्मा (Jitesh Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने 18.4 षटकांमध्येच 4 बाद 230 धावा केल्या. दरम्यान बंगळुरुला विजयासाठी 19 चेंडूत 29 धावांची आवश्यकता असताना लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीने मोठा डाव खेळला होता. मात्र ऋषभ पंतच्या एका निर्णयामुळे आक्रमक फलंदाजी करत असलेल्या जितेश शर्माला दिलासा मिळाला.
नेमकं काय घडलं?
बंगळुरुला विजयासाठी 19 चेंडूत 29 धावांची आवश्यकता असताना लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी गोलंदाजी करत होता. यावेळी दिग्वेश राठीने नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या जितेश शर्माला मंकडिंग (Mankading) पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने हा निर्णय मागे घेतला. जर निर्णय मागे घेतला नसता तर जितेश शर्मा बाद झाला असता आणि बंगळुरुचा संघ थोडा अडचणीत सापडला असता. मात्र ऋषभ पंतने अंपायरकडे जाऊन निर्णय मागे घेतला. ऋषभ पंतच्या या निर्णयानंतर जितेश शर्माने लगेच त्याला मिठी मारली.
No true RCB fan will scroll past without dropping a like ❤️#RCBvsLSGpic.twitter.com/xvRSjnDKaU
— Virat Kohli 🐦 (@im_vkohji) May 27, 2025
सामना कसा राहिला?
लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 धावा केल्या. रिषभ पंतच्या नाबाद 118 धावा आणि मिशेल मार्शच्या 67 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळं लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला. ब्रीटझके यानं 14, निकोलस पूरन यानं 13 धावा केल्या. रिषभ पंतच्या शतकामुळं लखनौ सुपर जायंटसनं 3 बाद 227 धावा केल्या. मात्र,विराट कोहली, फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा यांच्या दमदार फलंदाजीपुढं लखनौचे गोलंदाज अपयशी ठरले. विराट कोहलीनंतर जितेश शर्मानं षटकार चौकार मारत संघाला विजयाजवळ पोहोचवलं. लखनौचे फलंदाज अपयशी ठरल्यानं रिषभ पंतचं शतक वाया गेलं. लखनौच्या गोलंदाजांची खराब कामगिरी आणि खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
आयपीएलमधील प्लेऑफच्या लढती ठरल्या-
बंगळुरुच्या विजयानं प्लेऑफमधील लढती ठरल्या आहेत. क्वालिफायर 1 मधील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच 29 मे रोजी होणार आहे. तर, एलिमिनेटरमधील लढत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. एलिमिनेटर मधील विजेता संघ क्वालिफायर 1 च्या पराभूत संघासोबत क्वालिफायर 2 चा सामना खेळेल.




















