KL Rahul Injury: लखनौला मोठा धक्का, कर्णधार राहुल दुखातग्रस्त, मैदान सोडले, कृणाल पांड्याकडे नेतृत्व
KL Rahul Injury: आरसीबी आणि लखनौ यांच्यामध्ये सध्या इकाना स्टेडिअममध्ये सामना सुरु आहे.
LSG vs RCB, IPL 2023 : आरसीबी आणि लखनौ यांच्यामध्ये सध्या इकाना स्टेडिअममध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात आरसीबी प्रथम फलंदाजी करत आहे. प्रथम फिल्डिंग करणाऱ्या लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. फिल्डिंग करताना कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आहे. राहुल याची दुखापत गंभीर असल्याचे दिसत होते. राहुलला इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मैदानावर नेहण्यात आले. राहुलची दुखापत गंभीर असून त्याने मैदान सोडले आहे. अष्टपैलू कृणाल पांड्या याने संघाचे नेतृत्व सध्या सांभाळले आहे.
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी पाहाता दोन्ही संघाने फिरकी गोलंदाजांना प्राधान्य दिलेय. दोन्ही संघात तीन ते चार फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. फिल्डंग करताना लखनौला मोठा धक्का बसला आहे. राहुलला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. राहुलची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पण महत्वाच्या सामन्यात हा लखनौला मोठा धक्का मानला जातोय. राहलच्या दुखापतीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Wishing a speedy recovery to @klrahul
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2023
See you back on the field soon 👍🏻👍🏻#TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/2DPo7W2OuK
Wishing K L Rahul sir a speedy recovery. 🙏#KLRahul #RCBVSLSG pic.twitter.com/BM5Wso7jZQ
— Dalpat Razzpurohit (@DalpatSunielian) May 1, 2023
KL Rahul in lots of pain.
— Johns. (@CricCrazyJohns) May 1, 2023
He is walking off the pitch. pic.twitter.com/LBuPVsfKCg
Shame on those people who are making fun when someone is in pain, hope karma hits hard to you
— Sonu Jat (@Sonu_jat18) May 1, 2023
Get well soon #KLRahul #LSGvsRCB pic.twitter.com/MrNRm7sida
KL Rahul is off the field. pic.twitter.com/zbqxMEQWnS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 1, 2023
इकानाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस मदत करत असल्याचे दिसत आहे. विराट कोहली आणि फाफ डु प्लेलिस यांनी संयमी फलंदाजी करत आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. खेळपट्टी दुसऱ्या डावात संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फाफने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. विराट कोहली आणि फाफ यांनी ६० पेक्षा जास्त धावांची भागिदारी दिली. विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुज रावत यालाही मोठी खेळी करता आली नाही. अनुज १० धावा करुन बद झाला. फाफ एका बाजूला तळ ठोकून आहे.