एक्स्प्लोर

आयपीएल भारतात खेळवण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीपूर्वीच याचिकाकर्त्याकडून मागे

लाखोंची अनामत रक्कम हायकोर्टात जमा करण्यात असमर्थ असल्याची कबुली देत, आयपीएल भारतात खेळवण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीपूर्वीच याचिकाकर्त्याने मागे घेतली आहे.

मुंबई : यंदाचं आयपीएल भारतात खेळवण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीपूर्वीच याचिकाकर्त्यावर मागे घेण्याची वेळ आली. या सुनावणीसाठी लाखोंची अनामत रक्कम हायकोर्टात जमा करण्यात असमर्थ असल्याची कबुली देत याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेत असल्याचं कोर्टाला कळवलं.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं. आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी या याचिकेतून केली गेली होती. पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली. "आयपीएल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावजलेली एक मोठी स्पर्धा असल्याने हे देशासाठी उत्पन्न मिळण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे. या दरम्यान देशातील अनेक उद्योगांना चालना मिळत असते. मागील वर्षी आयपीएलचं ब्रॅण्ड मूल्य हे 475 अब्ज कोटी इतकं होतं. यावरुन याची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. म्हणूनच आयपीएल हे बीसीसीआयच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये हे सामने घेऊ नयेत," अशी मागणी याचिकेतून केली होती.

आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

"सध्याच्या परिस्थितीत देशात आयोजन शक्य नसल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे, ज्याला केंद्र सरकारनेही परवानगी दिलेली आहे. त्यानंतरही जर आम्ही या याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला काही लाख रुपये अनामत रक्कम म्हणून कोर्टात भरावे लागतील. जर याचिका स्वीकारली तर तुमची रक्कम तुम्हाला परत मिळेल, मात्र जर याचिका फेटाळली तर ही रक्कम गरिबांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला देण्यात येईल," असा पर्याय हायकोर्टाने मंगळवारी (18 ऑगस्ट) सकाळच्या सत्रात याचिकाकर्त्यांपुढे ठेवला होता. दिवसभराचं कामकाज संपायच्या आत याचिकाकर्त्यांना आपला निर्णय कळवण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. मात्र लाखोंची अनामत रक्कम जमा करण्यात असमर्थ असल्याची कबुली देत याचिकाकर्त्यांनी सुनावणीपूर्वीच याचिका मागे घेतली.

दरम्यान, आयपीएलचे सामने यंदा मार्चमध्ये होणार होते. मात्र कोरोनाच्या साथीमुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा आता सप्टेंबर 19 ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह, आणि अबूधाबी इथे भारत सरकारच्या परवानगीने हे सामने घेण्याचं बीसीसीआयने जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget