PBKS vs DC: पंजाब किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज मिचेश मार्शनं चांगलीच फटकेबाजी केली. त्यानं 48 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या सामन्यात पंजाबच्या संघानं नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. मात्र, आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे सामन्याच्या अखिरेस स्पष्ट होईल. 


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघानं सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वार्नरच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर सर्फराज खान आणि मिचेल मार्शनं संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये 51 धावांची भागेदारी झाली. परंतु, लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर सर्फराज बाद झाला. दिल्लीच्या संघाचे दोन विकेट्स पडल्यानंतर ललित यादव फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. ललीत यादवला सोबत घेऊन मिचेश मार्शनं संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अर्शदीप सिंहनं ललीत यादवला आपल्या जाळ्यात अडकवून दिल्लीच्या संघाला तिसरा धक्का दिला. दरम्यान, मिचेश मार्शनं संघाची एक बाजू संभाळून ठेवली. त्यानं 48 चेंडूत 63 धावा केल्या. मिचेश मार्शबाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. दिल्लीनं 20 षटकात सात विकेट्स गमावून 159 धावा केल्या. पंजाबकडून लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीप सिंहनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर कागिसो रबाडाला एक विकेट प्राप्त झाली.


दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन: 
ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, शार्दूल ठाकूर.  


पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन:
जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर. 


हे देखील वाचा-