CSK vs RR : राजस्थान रॉयल्सने रविवारी लखनौ संघाला मात देत गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. दरम्यान त्यांची दमदार कामगिरी आणखी सुधरणार आहे, कारण त्यांचा धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) लवकरच मैदानात उतरणार आहे. मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतलेला हेटमायर नुकताच भारतात परतला असून सध्या विलगीकरणात असल्याची माहिती आयपीएल एका सूत्राने पीटीआयला दिली आहे. 


राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत दमदार स्थितीत आहे. रविवारी त्यांनी चॅम्पियन लखनौ सुपरजायंट्सला 24 रनांनी मात देत दुसरं स्थान मिळवलं आहे. आता स्पर्धेतील त्यांचा शेवटचा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK vs RR) यांच्याशी असणार आहे. तोवर हेटमायर विलगीकरण कालावधी संपवून मैदानात उतरु शकतो. मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमध्ये हा सामना पार पडेल.


राजस्थान रॉयल्सनं केलं शिमरॉनचं अभिनंदन


राजस्थान संघासाठी मॅच विनिंग खेळी खेळणारा हेटमायर दोन दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीजला परतला होता. राजस्थान संघानं ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. हेटमायर त्याच्या बाळाच्या जन्मानंतर मुंबईला परतणार आहे आणि आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध राहणार आहे, अशीही माहिती देण्यात आली होती. 



शिमरॉन हेटमायर दमदार फॉर्मात


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात शिमरॉन हेटमायरनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यानं स्वत:च्या जीवावर राजस्थानच्या संघाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. राजस्थानच्या संघासाठी तो मध्यक्रमावर फलंदाजी करण्यासाठी येतो. तसेच सामना फिनिश करण्यासाठी आक्रमक फलंदाजी करतो. यंदाच्या हंगामात त्यानं 11 सामने खेळले आहेत. ज्यात 72.75 सरासरीनं 291 धावा केल्या आहेत. यात 18 चौकार आणि 21 षटकार आहेत. 


हे देखील वाचा-