PBKS vs DC, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 64 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) एकमेकांशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) हा सामना खेळला जाणार आहे. प्लऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघानं 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं दिल्लीच्या संघानंही 12 सामने खेळून सहा सामने जिंकले आहेत. तर, सहा सामन्यात पराभव पत्कारला आहे.


पंजाब- दिल्ली हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आजवर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी अगदी चुरशीची टक्कर एकमेकांना दिली आहे. यात पंजाबनं केवळ एक सामना अधिक जिंकत 15 विजय मिळवले आहेत. तर दिल्लीने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. आता पर्यंत दोन्ही संघाची एकमेंकाविरुद्धची कामगिरी अत्यंत अटीतटीची असल्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होण्याची शक्यता आहे. 


कधी, कुठे पाहायचा सामना?
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएल 2022 चा 64 वा सामना खेळला जाणार आहे. नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.


दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन:
ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकरिया, शार्दूल ठाकूर.  


पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन:
जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, संदीप शर्मा, राहुल चाहर.


हे देखील वाचा-