IPL 2022: राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल नेहमीच त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो. दरम्यान त्यानं राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज फलंदाज जोस बटलरसोबत आपल्या कॅपची अदलाबदल केली. त्यानं जोस बटलरची ऑरेंज कॅप घातली तर, त्याची पर्पल कॅप जोस बटलरला दिली. त्यावेळी युजवेंद्र चहलनं आपल्या विनोदानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. जोस बटलरची ऑरेंज कॅप घातल्यानंतर त्यानं विराट कोहलीचं 973 धावांचं रेकॉर्ड फक्त 10 सामन्यात मोडणार असल्याचं म्हटलं आहे. चहलच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


राजस्थान रॉयल्सनं नुकताच ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात व्हिडिओत चहल आणि बटलर नेटवर त्यांच्या विरुद्ध भूमिकेत दिसले. चहलनं आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 13 सामन्यांत 24 बळी घेतले आहेत आणि तो पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाल्यापासून युजवेंद्र चहल बर्‍याचदा जोस बटलरसोबत विनोद करताना दिसला आहे.


युजवेंद्र चहल काय म्हणाला?
दरम्यान, युजवेंद्र चहलनं क्रिकइंफोनं दिलेल्या मुलाखातीत असं म्हणाला आहे की, मला ओपनिंग करण्याची संधी मिळते, तर, मी केवल जोस बटलरचं नव्हेतर, प्रत्येक रेकॉर्ड मोडणार. मला असं वाटतं की विराट कोहलीचं 973 धावांचं रेकॉर्ड मोडणं माझ्यासाठी मोठं नाही. त्याचा विक्रम मी मोडणार आहे. फक्त 10 सामन्यातच मी विराटचा हा विक्रम मोडून टाकेल. यासाठी मला प्रत्येक सामन्यात शतक ठोकावं लागणार आहे. युजवेंद्र चहलच्या विनोदानं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. 


हे देखील वाचा-