PBKS vs DC : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या दोन संघात पार पडत आहे. पंजाबने नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याने पंतने हा निर्णय घेतला असावा. पण या मैदानात मागील काही सामन्यांत प्रथम फलंजाजी करणाऱ्या संघाने दिलेले माफक आव्हानही दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला पार करता आलेले नाही. त्यामुळे आज नेमकं काय होणार हे पाहावं लागेल. 



आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता पंजाब किंग्सचा कर्णधार मयांक अगरवाल याने आम्हाला हवा तसा संघ सापडल्याने आम्ही कोणताच बदल आज करणार नाही, असं सांगत मागील सामन्याती 11 खेळाडूंनाच खेळवलं आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने मात्र दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. दुखापतीतून सावरलेला खलील अहमद पुन्हा संघात आला असून चेतन साकरियाला विश्रांती दिली आहे. तर केएस भरतच्या जागी सरफराज खान खेळणार आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


दिल्ली अंतिम 11


ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, शार्दूल ठाकूर.  


पंजाब अंतिम 11  


जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर


हे देखील वाचा-