(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रथी महारथींच्या आरसीबीला अवघ्या 7 धावात मुस्तफिजुर रहमाननं 4 विकेटनं घाम फोडला!
Mustafizur Rahman, IPL 2024, CSK vs RCB : चेपॉकच्या स्टेडियमवर मुस्तफिजुर रहमान आरसीबीसाठी कर्दनकाळ टरला. त्यानं आरसीबीची तगडी फलंदाजी माघारी पाठवली
Mustafizur Rahman, IPL 2024, CSK vs RCB : चेपॉकच्या स्टेडियमवर मुस्तफिजुर रहमान आरसीबीसाठी कर्दनकाळ टरला. त्यानं आरसीबीची तगडी फलंदाजी माघारी पाठवली. मुस्तफिजुरच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचे रथीमहारथी स्वस्तात तंबूत परतले आहे. मुस्तफिजुर यानं अचूक टप्प्यावर मारा करत दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये फाफ डु प्लेसिस, विराट कोहली,कॅमरुन ग्रीन आणि रजत पाटीदार यांचा समावेश आहे. मुस्तफिजुरपुढे एकाही फलंदाजाची दाळ शिजली नाहीत. मुस्तफिजुर रहमान यानं दोन षटकांत अवघ्या 7 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
चेपॉकच्या मैदानावर फाफ डु प्लेसिस यानं आक्रमक सुरुवात केली. चौकारांचा पाऊस पाडला. फाफ डु प्लेसिस यानं दीपक चाहरची गोलंदाजी फोडून काढली. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर त्यानं पाच चौकार ठोकले. आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ यांनी आक्रमक सुरुवात केली. आरसीबी 180 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत होतं, पण चेन्नईने जोरदार कमबॅक केले. बिनबाद 41 वरुन पाच बाद 82 अशी दैयनीय अवस्था झाली आहे.
नाणेफेक आरसीबीच्या बाजूने, पण सामन्यावर चेन्नईचं वर्चस्व -
आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजीसाठी विराट कोहली आणि फाप मैदानात उतरले. कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं आक्रमक फलंदाजी केली. त्यानं एकापाठोपाठ एक चौकारांचा पाऊस टाकला. फाफ डु प्लेसिस यानं 8 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. फाफ डु प्लेसिस यानं 23 चेंडूत 35 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला विराट कोहली शांत आणि संयमी फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूला एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. मुस्तफिजुर रहमान यानं दोन वेळा... एकाच षटकात आरसीबीच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मुस्तफिजुरने आपल्या पहिल्या षटकात आधी धोकादायक फाफ डु प्लेसिस याला 35 धावांवर बाद केले. त्यानंतर रजत पाटीदार याला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. रजत पाटीदार याला खातेही उघडता आले नाही. मुस्तफिजुर यानं आपल्या दुसऱ्या षटकांमध्ये कॅमरुन ग्रीन आणि विराट कोहली यांना लागोपाठ तंबूत धाडलं. आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. ग्लेन मॅक्सवेल यालाही मोठी खेळी करता आली नाहीय दीपक चाहर यानं ग्लेन मॅक्सवेल याला धोनीकरवी झेलबाद केले. मॅक्सवेल शून्यावर बाद झाला. 14 षटकानंतर आरसीबीने पाच विकेटच्या मोबद्लायत 90 धावा केल्या आहेत.
आरसीबीची प्लेईंग 11 -
फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, मयांक डांगर, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ
चेन्नईची प्लेईंग 11 -
रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरेल मिचेल, महिश तिक्ष्णा, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, दीपक चाहर